जेव्हा लाबुशेन सामना सुरु असताना हिटमॅनला विचारतो क्वारंटाईनमध्ये काय केलंस? (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

शॉर्ट लेगला फिल्डिंग करणाऱ्या लाबुशेनने  पहिल्यांदा गिलला आणि त्यानंतर रोहित शर्माला डिवचण्याचा प्रकार केला. मार्नस लाबुशेन विचारणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन रोहितने खेळ कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.

Aus vs Ind 3rd Test : ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव आटोपल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. या जोडीने 70 धावांची भागीदारी केली. रोहितच्या रुपात भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. तर शुभमन गिल अर्धशतकी खेळी करुन माघारी फिरला. ही जोडी ज्यावेळी मैदानात खेळत होती त्यावेळी लाबुशेनने मजेदार अंदाजात दोघांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.  

शॉर्ट लेगला फिल्डिंग करणाऱ्या लाबुशेनने  पहिल्यांदा गिलला आणि त्यानंतर रोहित शर्माला डिवचण्याचा प्रकार केला. मार्नस लाबुशेन विचारणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन रोहितने खेळ कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. स्टम्प माईकमध्ये लाबुशेनचा कल्ला कैद झाला आहे.  
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  यात लाबुशेनने गिलला तुझा फेव्हरेट क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारताना दिसते. गिलने नंतर सांगतो म्हणून खेळ पुढे चालू ठेवला. दुसऱ्या चेंडूवर लाबुशेनने सचिन का विराट असा पर्याय त्याच्यासमोर ठेवला.  

पंतने संधी गमावली अन् पदार्पण करणाऱ्या पुकोवस्कीनं त्याच सोनं केलं (VIDEO)

गिलने यावर कहीच बोलला नाही.  गिलनंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून स्लेजिंगचा फंडा रोहितविरोधातही आजमावला.  क्वारंटाईन कालावधीत तू काय केलेस? या प्रश्नावर रोहितनेही मौन पाळणेच पसंत केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 131 आणि मार्नस लाबुशेनने 91 धावांची खेळी केली. कसोटी पदार्पण करणाऱ्या पुकोवस्कीनेही संघाच्या धावसंख्येत 62 धावांचे योगदान दिले. 

रोहित शर्मा आणि शुभमन गिलने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहितला मोठी खेळी करण्यात अपयश आले. हेजलवूडने त्याला 26 धावांवर झेलबाद केले. शुभमन गिलच्या रुपात कमिन्सने संघाला दुसरे यश मिळवून दिले. 


​ ​

संबंधित बातम्या