विकेटमागे पंत करतोय धोनीची कॉपी; बडबडीमुळे फलंदाज गोंधळात (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 13 व्या षटकात मॅथ्यू वेड अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करत होता. मॅथ्यू पुढे येऊन खेळणार आहे, असे पंतने अश्विनला सांगितले. फलंदाजाचे इरादे सांगताना चेंडू कुठे टाकल्यावर तो जाळ्यात अडकेल, याची भविष्यवाणी पंतने केली होती.

Aus vs Ind 2nd Test : मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या Melbourne Boxing Day Test पहिला दिवस भारतीय संघाने गाजवला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या टीम इंडियामध्ये चार बदल पाहायला मिळाले. यात अनुभवी वृद्धिमान साहाच्या जागी युवा पंतला संधी मिळाली. पंत धोनीचा वारसा पुढे चालवेल का? हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉक्सिंग डे कसोटीत याची छोटी झलक पाहायला मिळाली. यष्टीमागून पंत गोलंदाजांना प्रोत्साहन देत होता. एवढेच नाही तर चेंडू कुठे टाकावा. फलंदाज तो कसा मारु शकेल, हे देखील सांगताना दिसले. मॅथ्यू वेडच्या विकेटमागेही यष्टीमागे असलेल्या पंतचा बोलबाला दिसला.  

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 13 व्या षटकात मॅथ्यू वेड अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करत होता. मॅथ्यू पुढे येऊन खेळणार आहे, असे पंतने अश्विनला सांगितले. फलंदाजाचे इरादे सांगताना चेंडू कुठे टाकल्यावर तो जाळ्यात अडकेल, याची भविष्यवाणी पंतने केली होती. झालेही तसेच. मॅथ्यू पुढे येऊन मारण्याच्या नादात झेल देऊन परतला. त्याने 30 धावांची खेळी केली.  पंत आणि अश्विन यांच्यातील जुगलबंदीनं ऑस्ट्रेलियाने मॅथ्यूची विकेट गमावली. 

AusvsInd Boxing Day Test : झेल होणार की झोल, अश्विनला धडकी भरवणारा क्षण

मॅथ्यू वेडला माघारी धाडण्यात रविचंद्रन जडेजानेही योगदान दिले. त्याचा झेल घेण्यासाठी शुभमन गिल आणि जडेजा यांच्यात चुरस पाहायला मिळाले. दोघेही बॉलवर तुटून पडले. पण अनुभवी आणि क्षेत्ररक्षणात चपळ असलेल्या जडेजाने फायनली कॅच झेलला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ज्याप्रमाणे व्हायरल होत आहेत त्याच प्रमाणे पंतने विकेटमागची बडबडही व्हायरल झाली आहे. धोनी ज्याप्रमाणे विकेटमागून फलंदाजांचे इरादे गोलंदाजाला सांगायचा तसेच काहीतर पंत करताना दिसत आहे. 


​ ​

संबंधित बातम्या