IND vs AUS - 2nd Test, Day 1 - 36 च्या आकड्याचा कमालीचा योगायोग!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आघाडी मिळवल्यानंतर सामना गमावला होता. मागील आठवड्यातील शनिवारी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 36 धावात संपुष्टात आला.

Australia vs India  2nd Test Day 1:  भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात स्टार्कने मयांकला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही. डावाच्या सुरुवातीलाच पहिली विकेट पडल्यानंतर पुजारा मैदानात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिली कसोटी खेळणारा शुभमन गिल 28(38) आणि चेतेश्वर पुजाराने 7 (23) धावांवर खेळत होते. मागील शनिवारी पिंक बॉल कसोटीत भारतीय संघावर लाजीरवाणी वेळ ओढावली होती.

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आघाडी मिळवल्यानंतर सामना गमावला होता. मागील आठवड्यातील शनिवारी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 36 धावात संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 90 धावांचे अल्प आव्हान मिळाले. त्याने 2 विकेट गमावून हे लक्ष्य सहज पार केले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर  योगायोगाने भारताच्या धावफलकावर 36 धावा दिसल्या. टीम इंडियाने एक मात्र विकेट गमावली होती.

 AusvsInd Boxing Day Test : झेल होणार की झोल, अश्विनला धडकी भरवणारा क्षण

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पेनचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी फोल ठरवला. बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला धक्का दिला. त्यानंतर अश्विनच्या फिरकीतील जादू पाहायला मिळाली. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांनीही चांगली गोलंदाजी केली. परिणामी पहिल्या सामन्यात आघाडी घेतलेला कांगारुंचा संघ दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पिछाडीवर राहिला. बुमराहने सर्वाधिक 4 अश्विनने 3 तर मोहम्मद सिराजने पदार्पणाच्या सामन्यात 2 विकेट घेतल्या.

 जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत मोलाचे योगदान दिले. 
ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेननं 132 चेंडू खेळून 48 धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला परतीचा रस्ता दाखवला. वेडच्या 30 धावा, ट्रॅविस हेडच्य़ा 38 लायनने 20 धावा करुन डाव सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 195 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या डावाला सुरुवात झाली असून 1 गड्याच्या मोबदल्यात भारतीय संघाने 36 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाअखेर भारत 159 धावांनी पछाडीवर आहे. 


​ ​

संबंधित बातम्या