AUSvsIND : विराटनं कॅच सोडला तरी वेडला जावे लागले माघारी - VIDEO

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

आणि कॅच आउट होण्यापासून वाचल्यानंतर रन आउट होण्याची नामुष्की वेडवर ओढावली.

Australia vs India, 2nd T20I भारत आणि ऑस्ट्रेलिया  यांच्यातील दुसऱ्या सामन्यातही विराट कोहलीने क्षेत्ररक्षणावेळी झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी पहिल्या मॅचलाही त्याने शॉर्टचा झेल सोडला होता. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या टिम इंडियाने फिल्डिंगमध्ये खूप चुका केल्या. त्यातील विराट कोहलीने केलेल्या चुकीनंतर मॅथ्यू हेड त्यापेक्षा मोठी चूक करत विकेट फेकली.  

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 7.6 व्या षटकात वाशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मॅथ्यूने हवेत शॉट खेळला. विराट कोहलीला हा सोपा झेल पकडता आला नाही. हा कॅच सुटला त्यावेळी वेडने क्रिज सोडले होते. विराटने यातून सावर चेंडू लोकेश राहुलकडे टाकला. आणि कॅच आउट होण्यापासून वाचल्यानंतर रन आउट होण्याची नामुष्की वेडवर ओढावली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 194 धावांपर्यंत मजल मारली. फिंचच्या अनुपस्थितीत संघाचे नतृत्व करणाऱ्या वेडने कर्णधाराला साजेसा खेळ केला. त्याने अवघ्या 32 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार खेचला. त्याने रन आउटच्या स्वरुपात विकेट फेकली नसती तर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत निश्चितच आणखी भर पडली असती.


​ ​

संबंधित बातम्या