AUSvsIND : कांगारुंवर शतकात पहिल्यांदाच ओढावली अशी नामुष्की!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

शतकात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर अशा प्रकारची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. संघाचे खाते उघडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला यापूर्वी अशा प्रकारचा संघर्ष कधीच करावा लागला नव्हता.

Aus vs Ind 1st Test Day 2 : पहिल्या डावात भारतीय संघाला 244 धावांत आटोपून गोलंदाजीतील धार दाखवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसतोय. उपहारापूर्वीच भारतीय संघाने त्यांच्या सलामीवीरांना माघारी धाडले. मेथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर 1 धावा लावण्यासाठी या जोडीला  पाचव्या षटकांपर्यंत वाट पाहावी लागली. मॅथ्यू वेडनं उमेश यादवच्या षटकात चौकार खेचून संघाचे खाते उघडले. 

शतकात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर अशा प्रकारची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. संघाचे खाते उघडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला यापूर्वी अशा प्रकारचा संघर्ष कधीच करावा लागला नव्हता. पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा डाव 244 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलिया फ्रंटफूटवर होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी आपल्यातील क्षमता दाखवत ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव टाकण्यात यश मिळवले आहे.

जाणून घ्या सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

ऍडलेडच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघाचे खाते उघडण्यासाठी 28 चेंडूचा सामना केला. 27 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर संघाच्या धावफलकावर 4 धावा जमा झाल्या. ऑस्ट्रेलियन संघ हा कोणत्याही परिस्थितीत आक्रमक सुरुवात करण्यास ओळखला जातो. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा रुबाब नाहीसा केलाय. 

जसप्रीत बुमराहने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडत संघाला सामन्यात परत आणले आहे. भारतीय संघाच्या ढिसाळ फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही निराशजनक कामगिरी पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणात ढिलाई केली नसती तर ऑस्ट्रेलियाची अवस्था आणखी बिकट झाल्याचे दिसले असते. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स प्रत्येकी 8-8 धावा करुन परतले. स्मिथही 29 चेंडू खेळून अवघी 1 धाव काढून परतला आहे.


​ ​

संबंधित बातम्या