सवंगडी मैदान सोडून जात असताना लाबुशेनला लाभली नशीबाची साथ (Video)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर बराच काळ टिकण्यात त्याला क्षेत्ररक्षकांनी हातभार लावलाय. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्याला बाद करण्याची संधी हुकली.

Australia vs India, 1st Test :  ऍडलेडच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली छाप सोडली. संघाचा पहिला डाव अडीचशेच्या आत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हानही खूप वाटेल असा मारा भारतीय गोलंदाजांनी केला. आघाडीचे गडी स्वस्तात माघारी फिरल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था बिकट झाली आहे. मात्र मार्नस लाबुशेन एका बाजूनं तग धरुन उभा आहे. 

भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर बराच काळ टिकण्यात त्याला क्षेत्ररक्षकांनी हातभार लावलाय. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्याला बाद करण्याची संधी हुकली. बुमराहकडून सीमारेषेवर त्याचा कॅच सुटला. हे कमी होते की काय म्हणून फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या पृथ्वी शॉने क्षेत्ररक्षणातही ढिसाळ कामगिरी करुन लाबुशेनच्या खेळीत भर घातली.ऑस्ट्रेलियाच्या डावीतील 23 व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने लाबुशेनचा झेल सोडला. पहिला झेल सोडला त्यावेळी लाबुशेन 12 धावांवर खेळत होता तर दुसरा झेल सोडला त्यावेळी तो 22 धावांवर खेळत होता.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे अपडेट्स एका क्लिकवर

आयसीसीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन लाबुशेनची चेंडू सोडण्याची हटके स्टाईलवाला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. संघ अडचणीत असताना कोणतेही टेन्शन न घेता तो क्रिकेटचा आनंद घेत असल्याचे चित्रच या व्हिडिओतून दिसून येते. 


​ ​

संबंधित बातम्या