टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; बुमराह देखील बिस्ब्रेन कसोटीतून आउट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

Jasprit Bumrah Ruled Out Of Brisbane Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला आहे. तिसऱ्या कसोटीत ऐतिहासिक कामिगिरीची नोंद झाल्यानंतर रविंद्र जडेजानंतर हनुमा विहारी ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात आता आणखी भर पडली आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.  बीसीसीआयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) च्या पोटातील मांस पेशी ताणली गेल्यामुळे तो आगामी कसोटी सामन्यात मैदानात उतरणार नाही. 

सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षणावेळी झाली होती दुखापत 
 

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,   सिडनीच्या मैदानात क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहचा पोटातील स्नायूला दुखापत झाली. त्यामुळे तो ब्रिस्बेन कसोटीमध्ये खेळणा नाही. बुमराहच्या दुखापतीनंतर भारतीय गोलंदाजीची धूरा मोहम्मद सिराज करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 15 जानेवारीपासून होणाऱ्या सामन्यात  नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि टी नटराजन या गोलंदाजासोबत टीम ऑस्ट्रेलियाला टक्कर देईल. 

बुमराहच्या जागेवर नटराजनला मिळू शकते संधी 

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टी नटराजन कसोटीमध्ये पदार्पण करु शकतो. याशिवाय अन्य कोणताही पर्यायच टीम इंडियाकडे उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतीला सामोरे जावे लागले. तिसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीही घायाळ झाला होता. त्यापूर्वी रविंद्र  जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. रविचंद्रन अश्विन पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याचे समोर आले होते.  

पुजारा, पंत आणि अश्विनच्या टीकाकारांना दादाचं प्रत्युत्तर; काय म्हणाला पाहा 

पंत आणि साहा दोघही उतरतील मैदानात 

हनुमा विहारी ब्रिस्बेन कसोटीला मुकणार असल्यामुळे त्याच्या जागेवर वृद्धिमान साहाला संघात स्थान देण्यात येऊ शकते. तो या सामन्यात यष्टिमागची जबाबदारी सांभाळतानाही दिसेल. पंत फलंदाजीच्या जोरावर संघात दिसू शकतो. हनुमा विहारीनं  161  नाबाद 23 धावा करत सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला होता.  

शार्दुल ठाकुर घेईल जडेजाची जागा 

रविचंद्रन जडेजाच्या जागेवर शार्दुल ठाकूरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल. जडेजा ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने यापूर्वी स्पष्ट केले आहे.    


​ ​

संबंधित बातम्या