चार बळी टिपत आर अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने शानदार गोलंदाजी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने शानदार गोलंदाजी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर बाद झाला. आणि त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले. फिरकीपटू आर अश्विनने पहिल्या डावात चार बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट घेण्याच्या बाबतीत भारतीय संघाचे माजी अनुभवी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले. 

बोल्ड झाला पृथ्वी आणि ट्रोल झाले शास्त्री;  जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदाच डे नाईट सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात फलंदाजी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय फिरकीपटू आर अश्विनने चांगलेच धक्के दिले. आर अश्विनने पहिल्या डावाच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज स्टीव्ह स्मिथची विकेट घेतली. यानंतर त्याने हेडला अवघ्या सात धावांवर माघारी धाडले. या दोघांना बाद केल्यानंतर अश्विनने कॅमेरून ग्रीन आणि नॅथन लियॉन यांना देखील माघारी धाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातच आर अश्विनने चार बळी टिपले. 

आर अश्विनच्या या कामगिरीने त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये घेतलेल्या विकेटची संख्या 81 झाली आहे. आणि त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज ठरला आहे. व ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात अधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. व यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू यांना मागे टाकले आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी 79 विकेट्स घेतले आहेत.        

AUSvsIND : शमीनं फाटलेला शूज घालण्यामागचं कारण माहितेय का?   

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतील सर्वाधिक विकेट्स फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर आहेत. अनिल कुंबळे यांनी 111 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर हरभजन सिंग याबाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे. त्याने 95 बळी टिपलेले आहेत. तर कपिल देव चौथ्या स्थानावर गेले असून, पाचव्या क्रमांकावर झहीर खान आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 61 खेळाडूंना बाद केले आहे. 

कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज -
अनिल कुंबळे - 111 विकेट्स 
हरभजन सिंग - 95 विकेट्स 
आर अश्विन - 81 विकेट्स 
कपिल देव - 79 विकेट्स
झहीर खान - 61विकेट्स 


​ ​

संबंधित बातम्या