विराट-रोहितमधील 'अबोला' बरा नव्हे; नेहराचा यॉर्कर

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 28 November 2020

युएईमध्ये आयपीएलमध्ये खेळल्यानंतर रोहित आमच्यासोबत असेल असे वाटले होते. त्याच्या दुखापतीसंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही, असे विधान विराट कोहलीनं केलं. आयपीएलच्या मैदानात एकत्र असूनही या दोघांमध्ये संवाद झाला नाही, ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. जर तसे असेल तर इंग्लंडमधील विश्वचषकापासून दोघांच्यात निर्माण झालेली दरी कमी झालेली नाही, असेच काहीसे म्हणावे लागेल. विराट कोहलीच्या स्टेटमेंटमुळे बीसीसीआयला स्पष्टीकरण देण्याची वेळी आली. त्यानंतर आता भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराने दोघांच्यामधील अबोल्यावर भाष्य केले आहे.  

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड न झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हापासून रोहित शर्मा चर्चेत आहे. दुखापतीमुळे संघातील स्थान मिळवण्यात मुकल्याची चर्चा असताना आता  रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात बिलकूल  संवाद नाही, ही गोष्ट समोर आली आहे. खुद्द विराट कोहलीने पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागले आहे.   

युएईमध्ये आयपीएलमध्ये खेळल्यानंतर रोहित आमच्यासोबत असेल असे वाटले होते. त्याच्या दुखापतीसंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही, असे विधान विराट कोहलीनं केलं. आयपीएलच्या मैदानात एकत्र असूनही या दोघांमध्ये संवाद झाला नाही, ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. जर तसे असेल तर इंग्लंडमधील विश्वचषकापासून दोघांच्यात निर्माण झालेली दरी कमी झालेली नाही, असेच काहीसे म्हणावे लागेल. विराट कोहलीच्या स्टेटमेंटमुळे बीसीसीआयला स्पष्टीकरण देण्याची वेळी आली. त्यानंतर आता भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराने दोघांच्यामधील अबोल्यावर भाष्य केले आहे.  

विराट कोहलीनं ज्याप्रमाणे वक्तव्य केलं त्यातून टीमच्या सदस्यांमध्ये कम्युनिकेशन गॅप असल्याचे दिसून येते. आताच्या युगात दूर राहूनही संवाद सहज शक्य असताना भारतीय संघात अशी परिस्थिती पाहायला मिळणं वाईट आहे, असे नेहराने म्हटले आहे. कर्णधार आणि उप कर्णधार यांच्यात संवादच होत नसेल, ती चिंतेची बाब आहे. आयपीएलच्या दरम्याम भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांनी एकमेकांसोबत चर्चा केली असती तर गुंतागुत निर्माण झाली नसती, असे मत नेहराने एका कार्यक्रमात बोलून दाखवले.  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले नाही. दुखापतीमुळे त्याला संधी दिली नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. कसोटी संघात त्याची वर्णी लागली. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यालाही तो मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन सामन्यात तो खेळणार की नाही  हे देखील11 डिसेंबरपर्यंत समोर येईल. 

​ ​

संबंधित बातम्या