INDvsAUS : विराट कोहलीचा आणखी एक विश्वविक्रम 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वात दमदार फलंदाज म्हणून ओळखला जातो.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वात दमदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत फलंदाजी करताना अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे विराटला रेकॉर्ड बुक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम केला आहे.   

AUSvsIND : जाणून घ्या दुसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान 22 हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात विराटने ही कामगिरी केली आहे. विराटने या डावात 78 धावा पूर्ण केल्या. तेंव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  22000 धावा पूर्ण केल्या. विराटने टी -20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून 22 हजार धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का जायबंदी; मैदान सोडून जावे लागले हॉस्पिटलात

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार, 11 हजार, 12 हजार, 13 हजार, 14 हजार, 15 हजार, 16 हजार, 17 हजार, 18 हजार, 19 हजार, 20 हजार, 21 हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज आहे. व त्यानंतर आता विराटने 22 हजार  धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजच्या सामन्यात विराट कोहली शतकाच्या जवळ येऊन बाद झाला. त्याला जोश हेझलवूडने हेनरिक्स करवी झेलबाद केले. व तो 89 धावांवर बाद झाला. आजच्या डावात 87 चेंडूंचा सामना करताना विराटने सात चौकार आणि दोन षटकार ठोकले.     

यावतिरिक्त, कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना 69 धावा करताच ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 2 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध  2 हजार धावा पेक्षा अधिक धावा करणारा विराट हा तिसरा भारतीय खेळाडू व जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दोन हजार धावा केल्या आहेत. तर, डेसमॉन्ड हंस आणि विव्ह रिचर्ड्स यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना  2 हजार हुन अधिक धावा केल्या होत्या.    


​ ​

संबंधित बातम्या