अजिंक्यचा खास सन्मान! मानाचं Mullagh Medal पटकावणारा ठरला पहिलाच खेळाडू

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा बॉक्सिंग डे सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून मालिकेत पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा बॉक्सिंग डे सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून मालिकेत पुनरागमन केले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची धुरा सांभाळतानाच या सामन्यात प्रभावशाली खेळी देखील केली. त्यामुळे अजिंक्य रहाणेने या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावर केला. याशिवाय अजिंक्य रहाणेने जॉनी मुलाग पदक देखील पटकावले आहे.        

AUSvsIND 3rd Test : जे ठरलं तसेच होणार; सामना सिडनीतच

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवण्यात येणार बॉक्सिंग डे सामना हा नेहमीच प्रत्येक संघासाठी खास असतो. आणि या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलाग यांच्या सन्मानार्थ सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात येतो. जॉनी मुलाग हे परदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या पहिल्या ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार होते. जॉनी मुलाग यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1868 मध्ये  इंग्लंडला भेट दिली होती. तसेच मुलाग हे ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे जॉनी मुलाग यांच्या सन्मानार्थ बॉक्सिंग डे कसोटीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मुलाग पदक क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात येते. आणि ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या बॉक्सिंग डे सामन्यात अजिंक्य रहाणेने सर्वोत्तम कामगिरी करत मुलाग पदक मिळवले आहे. 

AUSvsIND: पराभव पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीचा दे धक्का  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाला 195 धावांवर रोखले होते. व अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 326 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात 223 चेंडूंचा सामना करताना 112 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्या डावात 200 धावा करता आल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य मिळाले होते. यावेळी अजिंक्य रहाणेने नाबाद राहत 27 धावा केल्या. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असलेल्या जॉनी मुलाग यांचे खरे नाव उनारिमिन होते. आणि 1868 मध्ये त्यांनी प्रादेशिक संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय या दौऱ्यात त्यांनी 47 पैकी 45 सामने खेळत, 23 च्या सरासरीने 71 डावात मिळून 1698 धावा केल्या. याव्यतिरिक्त 1877 षटके देखील त्यांनी टाकली. आणि यातील 831 षटके जॉनी मुलाग यांनी मेडन टाकली होती. इतकेच नाही तर 10 च्या सरासरीने त्यांनी 257 बळी टिपले होते. व 1866 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानात मुलाग यांनी बॉक्सिंग डे कसोटी सामनाही खेळला होता.  


​ ​

संबंधित बातम्या