AUSvsIND : हिटमॅनच करणार डावाची सुरवात; भारतीय कर्णधारानं सांगितला प्लॅन 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी पिंक टेस्ट उद्यापासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी पिंक टेस्ट उद्यापासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनची आज घोषणा केली. त्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. पहिला म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची संघात एन्ट्री झालेली आहेत, तर दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 

AusvsInd : हिटमॅन रोहितच्या कमबॅकमुळं मयांक बाकावर; सैनी करणार पदार्पण

भारतीय संघाकडून आठ कसोटी सामन्यांमध्ये खेळताना सात सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या मयांक अग्रवालला प्लेयिंग इलेव्हन मधून वगळण्यात आले आहे. व त्याच्या जागी भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने तिसऱ्या कसोटी सामन्याच्याअगोदर बोलताना रोहित शर्मा नेट मध्ये चांगली फलंदाजी करत असून, या सामन्यात तोच भारतीय संघाच्या डावाची सुरवात करणार असल्याचे स्पष्ट केले. पिंक टेस्ट सामन्याच्या अगोदर अजिंक्य रहाणेने व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना रोहित शर्मा संघात परतत असल्यामुळे उत्साहित असल्याचे सांगितले. 

अजिंक्य रहाणेने रोहित शर्माबाबत बोलताना, तो मेलबर्न मध्ये संघात सहभागी झाल्यावरच त्याने सराव करण्यास सुरवात केल्याचे सांगितले. तसेच सध्या तो नेटमध्ये उत्तम फलंदाजी करत कसून आगामी सामन्यांमध्ये रोहित शर्माच टीम इंडियाच्या डावाची सुरवात करणार असल्याचे अजिंक्य रहाणेने सांगितले. याशिवाय मागील काही कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाची सुरवात करताना, चांगले प्रदर्शन केल्याचे अजिंक्य रहाणेने नमूद केले.   

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे असलेल्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत (एनसीए) रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सुरवातीला काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. व त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील तो अनुपस्थित राहिला होता. तर मेलबर्न येथे पार पडलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघात दाखल झाला होता.      


​ ​

संबंधित बातम्या