AusvsInd : कांगारुंचे बारा वाजवणारा योगायोग; अजिंक्यच्या नावे झाला अनोखा विक्रम

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

मेलबर्नच्या मैदानात विनू मंकड यांनी यापूर्वी शतकी खेळी साकारली होती. त्यांनी 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर या मैदानात शतक करणारा अजिंक्य रहाणे भारताचा दुसरा फलंदाज आहे.

Australia vs India, 2nd Test :ऑस्ट्रलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत  स्थितीत आहे. भारतीय संघाला सावरण्याचे काम कर्णधार अजिंक्य रहाणेनं केलं. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी साकारली. दुसऱ्या दिवसाअखेर तो नाबादही राहिला. कसोटी कारकिर्दीतले अजिंक्यने 12 वे शतक झळकावले. योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतकी खेळी करणारा तो भारताचा 12 वा कर्णधार ठरला. 

मेलबर्नच्या मैदानात विनू मंकड यांनी यापूर्वी शतकी खेळी साकारली होती. त्यांनी 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर या मैदानात शतक करणारा अजिंक्य रहाणे भारताचा दुसरा फलंदाज आहे. त्याच्याशिवाय  मोहम्मद अझरुद्दीन याने एडलेडच्या मनैदानात 106 धावांची खेळी केली होती. 1991-92 मध्ये सचिन तेंडुलकरने 116 एमसीजीच्या मैदानात 116 धावांची खेळी साकारली होती. गाबाच्या मैदानात 2003-04 मध्ये गांगुलीने 144 धावा ठोकल्या होत्या. विराट कोहलीने 14-15 च्या दौऱ्यावर एडलेडच्या मैदानात 115 आणि 141, एससीजी च्या मैदानात 123 धावांची खेळी केली होती. 2018 मध्येही विराटच्या भात्यातून ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक निघाले होते. त्याने पर्थच्या मैदानात 123 धावांची खेळी केली होती. 

विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेसा खेळ केला. नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी उतरल्यावर त्याने नेतृत्वातील आक्रमकता दाखवली. फिल्डिंग सजावट आणि बॉलिंगमधील परिवर्तन याने सर्वाचे लक्ष्य वेधून घेतले. कांगारुंना थोडक्यात आटोपल्यानंतर भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. मयांक अग्रवालला खातेही खोलता आले नाही. शुभमन गिल अर्धशतकाच्या घरात येऊन बाद झाला. पुजारालाही फारशी चमक दाखवता आली नाही. यावेळी हनुमा विहारीसोबतची अर्धशतकी भागीदारी आणि जडेसोबत मजबूत भागीदारी करत अजिंक्यने संघाला फ्रंटफूटवर आणले आहे. तिसऱ्या दिवशी तो भारतीय संघाच्या धावफलकावर किती धावा जोणार आणि कसोटीचा निकाल आपल्या बाजूनं वळवण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या