फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर हिटमॅन अखेर ऑस्ट्रेलियासाठी रवाना 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

ऑस्ट्रेलियातील अखेरच्या दोन कसोटी खेळण्याचे लक्ष्य बाळगत रोहित शर्मा दुबई मार्गे ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियातील अखेरच्या दोन कसोटी खेळण्याचे लक्ष्य बाळगत रोहित शर्मा दुबई मार्गे ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. मंगळवारी पहाटे रोहित मुंबईहून दुबईला रवाना झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबतच्या अखेरच्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. 

वृद्धिमन साहाऐवजी पंतला संधी द्या - सुनील गावसकर 

पहिल्या कसोटीपूर्वी रोहित ऑस्ट्रेलियात दाखल होईल. पण पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीच्या वेळी तो विलगीकरणात असल्यामुळे त्याला या सामन्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत त्याला तंदुरुस्ती वाढविण्याकडे लक्ष देता येणार आहे. शिवाय भारतीय संघातील समावेशापूर्वी त्याची ऑस्ट्रेलियात तंदुरुस्ती चाचणी होणार आहे.

AUSvsIND: कोहलीने शतक केल्यास नावावर होऊ शकतो रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड  

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील सामन्यांमध्ये रोहितच्या मांडीला दुखापत झाली होती. व त्यानंतर त्याला आयपीएल मधील काही सामने खेळता आले नव्हते. मात्र स्पर्धेतील अखेरच्या काही सामन्यांमध्ये रोहितने सहभाग घेतला होता. याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बेंगळुरू स्थित तंदरुस्ती शिबीरात दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने फिटनेस टेस्ट पास केली होती. 


​ ​

संबंधित बातम्या