राष्ट्रगीत झाल्यावर सिराज झाला भावूक; व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ सुरु होण्याअगोदर असे काही पाहायला मिळाले ज्याच्यामुळे जगभरातील तमाम भारतीयांचे मन नक्कीच भारावले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारताचे राष्ट्रीगीत चालू झाल्यावर आपले अश्रू रोखू शकला नाही. 

AUSvsIND 3rd Test D1: पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय; ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत...

ऑस्ट्रेलियासोबतच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघ मैदानावर आल्यावर भारताचे राष्ट्रगीत झाले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेतून पदार्पण करत असलेल्या मोहम्मद सिराजच्या डोळ्यात अश्रू आले. आणि त्यानंतर मोहम्मद सिराजचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे सामन्यातून मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले. या सामन्यात सिराजने पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला सिडनी येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील प्लेयिंग इलेव्हन मध्ये संधी देण्यात आली आहे. 

AusvsInd: सिराजच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून वॉर्नर फसला!

तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर, मोहम्मद सिराजने राष्ट्रगीताच्या वेळी वडिलांची आठवण झाल्याचे सांगितले. व देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी त्यांची इच्छा होती. ती सत्यात आल्यामुळे डोळ्यात अश्रू आल्याचे मोहम्मद सिराजने पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय मोहम्मद सिराजने आज आपले वडील असते तर नक्कीच त्यांना याचा अभिमान वाटला असता, असे सांगितले. मागील वर्षाच्या 20 नोव्हेंबर रोजी सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. 

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळणारा मोहम्मद सिराज संयुक्त अरब अमिरातीतून थेट ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी पोहचला होता. आणि वडिलांच्या निधनानंतर मोहम्मद सिराजला जैवसुरक्षिततेच्या नियमामुळे मायदेशी परतता आले नव्हते. तर तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराजने दुखापतीतून पुनरागमन करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला बाद केले. डेव्हिड वॉर्नर अवघ्या पाच धावांवर झेलबाद झाला.             


​ ​

संबंधित बातम्या