''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू  घ्यावा''

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. शिवाय चार सामन्यांच्या या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा मायदेशी परतणार आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. आणि यामुळे निश्चितच संघाच्या कामगिरीवर परिणाम होण्याशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. व त्यासाठी भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक पर्याय सुचवला आहे.

AUS vs IND : टीम इंडियाला मोठा धक्का; फॅक्चरमुळं शमी झाला आउट!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहली नसल्यामुळे भारतीय संघाची धुरा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. आणि हे त्याच्यासाठी मोठे आव्हान असेल. तसेच संघाचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमी देखील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडल्यामुळे संघाची गोलंदाजीही कमकुवत होईल. या परिस्थितीवर माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी मोहम्मद शमीच्या जागी इशांत शर्माला संघात सामील करण्याचा सल्ला दिला आहे. 

मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर पडणे ही भारतीय संघासाठी मोठा धक्का असल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. शमीकडे विकेट घेण्याची क्षमता असून तो त्याच्या बाऊन्सर आणि यॉर्करसमवेत विरोधी फलंदाजांना अडचणीत आणतो. मात्र आता तो संघात नसल्यामुळे भारतीय संघासमोर मोठी समस्या निर्माण झाल्याचे सुनील गावस्कर यांनी सांगितले. आणि अशा परिस्थितीत इशांत शर्माला ऑस्ट्रेलियाला पाठवणे योग्य ठरेल, असे सुनील गावस्कर म्हणाले. याव्यतिरिक्त, इशांत शर्मा जर पूर्णपणे तंदरुस्त असेल तरच त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवणे शक्य होणार असल्याचे सुनील गावस्कर यांनी पुढे नमूद केले. तसेच इशांत शर्मा जर एका दिवसात 20 षटके टाकू शकत असेल तर त्याने अधिक वेळ न दवडता उद्याच्या उद्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना व्हावे. जेणेकरून तो सिडनीच्या कसोटीत उपलब्ध होऊ शकेल, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. 

AUS vs IND: ' फक्त द्रविडच टीम इंडियाला संकटातून बाहेर काढू शकतो'

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत होईल. 

  


​ ​

संबंधित बातम्या