बोल्ड झाला पृथ्वी आणि ट्रोल झाले शास्त्री;  जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका कालपासून सुरु झाली.

एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका कालपासून सुरु झाली. या मालिकेतील पहिला सामना डे नाईट अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येत आहे. आणि या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता दुसर्‍या डावात भारताने फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सोशल मीडियावर भारतीय संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ सर्वाधिक ट्रोल झाला आहे. आणि त्याच्या सोबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील चांगले ट्रोल होत आहेत. 

AUSvsIND : शमीनं फाटलेला शूज घालण्यामागचं कारण माहितेय का?

भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्या डावात शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा  खेळ संपताना भारताने फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. आणि या डावात देखील शॉ पूर्णपणे फ्लॉप झाल्याचे पाहायला मिळाले. व यानंतर सोशल मीडियावर पृथ्वी शॉ व संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मीम्स चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

खरे तर मागील काही सामान्यांपासून पृथ्वी शॉ धावांसाठी झगडताना दिसत आहे. याशिवाय यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत देखील पृथ्वी शॉ फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील तो मोठी खेळू करू शकला नाही. व त्यामुळेच सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पृथ्वी शॉचे कौतुक केले होते. व त्यांनी पृथ्वी शॉची तुलना भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्याशी केली होती. पण चालू असलेल्या सामन्यात पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरल्यामुळे युझर्सनी सोशल मीडियावर पृथ्वी शॉची खिल्ली उडवण्यास सुरवात केली. आणि त्याच्या सोबत रवी शास्त्री यांच्यावर देखील युझर्सनी आपला मोर्चा वळवला आहे. 

अनवाणी पायाने कांगारू उतरले मैदानात; वाचा काय आहे यामागचे कारण   

दरम्यान, पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉ मिचेल स्टार्कचा शिकार बनला होता. आणि तो शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात शॉला पॅट कमिन्सने चार धावांवर माघारी धाडले.          


​ ​

संबंधित बातम्या