ॲडलेड कसोटीबाबत अनिश्‍चितता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिली कसोटी प्रकाशझोतात घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आग्रही आहे. त्यामुळे ही कसोटी ॲडलेडला न झाल्यास त्यासाठी ब्रिस्बेनचा पर्याय तयार ठेवण्यात आला आहे. दुसरी कसोटी मेलबर्नला असल्याने सलग दोन कसोटी मेलबर्नला खेळवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया तयार नाही. त्याचबरोबर मेलबर्न असलेल्या व्हिक्‍टोरियातील लॉकडाऊन नुकताच उठवण्यात आला आहे. 

ॲडलेड : लॉकडाऊनला सामोरे जात असलेल्या ॲडलेडमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीबाबतचा निर्णय या महिन्याअखेरपर्यंत घेण्यात येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया ॲडलेडमधील प्रकाशझोतातील कसोटीसाठी आग्रही असले तरी हे आव्हान सोपे नाही अशी चिन्हे दिसत आहेत. 

ॲडलेडमधील निर्बंधानुसार सध्या तिथे खुल्या मैदानातील सरावास तसेच खेळण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ॲडलेड असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलियातील अनेकांना कोरोनाची लागण अजाणतेपणे झाली असणार. ते कोणाच्या संपर्कात आले आहेत, त्यानुसार तपासणी करणे सोपे नाही, असे दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रमुख स्टीवन मार्शल यांनी सांगितले आहे. मार्शल यांच्या टिपण्णीमुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. ॲडलेडमधील सर्वात महत्त्वाचा हॉटस्पॉट हा पॅराफिल्ड एरिया आहे. ॲडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमपासून तो सतरा किलोमीटर दूर आहे. या परिसरातील हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी सर्किट ब्रेकर लॉकडाऊन असतो. सध्या हाच लॉकडाऊन ॲडलेडमध्ये आहे. 

ॲडलेडसाठी ब्रिस्बेनचा पर्याय

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिली कसोटी प्रकाशझोतात घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आग्रही आहे. त्यामुळे ही कसोटी ॲडलेडला न झाल्यास त्यासाठी ब्रिस्बेनचा पर्याय तयार ठेवण्यात आला आहे. दुसरी कसोटी मेलबर्नला असल्याने सलग दोन कसोटी मेलबर्नला खेळवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया तयार नाही. त्याचबरोबर मेलबर्न असलेल्या व्हिक्‍टोरियातील लॉकडाऊन नुकताच उठवण्यात आला आहे. 

​ ​

संबंधित बातम्या