भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळू शकेल एन्ट्री!

टीम ई-सकाळ
Saturday, 13 June 2020

कोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. प्रेक्षकांशिवाय रंगणारी क्रिकेटच्या मैदानातील ही पहिली मालिका असेल.

कॅनबेरा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ओस पडलेल्या खेळाच्या मैदाने पुन्ही खुली करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. संकटजन्य परिस्थितीनंतर वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवानाही झालाय. कोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. प्रेक्षकांशिवाय रंगणारी क्रिकेटच्या मैदानातील ही पहिली मालिका असेल. कोरोनाजन्य परिस्थितीनंतर खेळ स्पर्धा पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत असताना प्रेक्षकांना स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी किती कालावधी लागणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.  

धोनीसारखं मला कधीच जमलं नाही : राहुल द्रविड

या वर्षाच्या अखेरिस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी स्कॉट मॉरिसन म्हणाले की,  40 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमवर पुढील महिन्यापासून 10 हजार प्रेक्षकांना एन्ट्री देऊन स्पर्धा खेळवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियात कोणत्याही स्पर्धेच्या आयोजकांना 25 टक्के पेक्षा अधिक तिकीट विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे पंतप्रधानांनी अधिकृत निवदेनाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. याचा अर्थ स्पर्धे प्रेक्षकांशिवाय खेळवण्याऐवजी काही योग्य ती खबरदारी घेऊन प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.  

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) वाचवण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना 3 चे 7 डिसेंबर रोजी ब्रिस्बेनवर खेळवण्याचे नियोजित आहे. दुसरा सामना हा 11 ते 15 डिसेंबर दरम्यान एडलेडवर रंगणार असून  मेलबर्नच्या मैदानात 26 ते 30 डिसेंबर रोजी तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे.  चौथा आणि अखेरता कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी 2021 मध्ये सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असेल. कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीर चार ठिकाणी सामने खेळवण्याऐवजी दोन ठिकाणीच सामने खेळवण्याबात क्रिकेट ऑस्ट्रेलिया विचार करत आहे.  


​ ​

संबंधित बातम्या