तर भारतीय संघाला एकाच ठिकाणी खेळावे लागू शकतात चारही कसोटी सामने 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

भारतीय संघ तीन डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधी दरम्यान चार कोसोटी सामने खेळणार आहे

कोरोना व्हायरस माहामारीमुळे बंद पडलेले क्रिकेट सामने परत सुरु करण्यासाठी जगभरातील क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेच्या आयोजनाबद्दल ठाम असून, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सर्व सामन्यांचे आयोजन एकाच ठिकाणी करण्याचा विचार देखील करण्यात योत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी सर्व कसोटी सामन्याच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या सामन्यांच्या निश्चीतीनंतर देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यानी माहामारीचा धोका पाहाता विमान प्रवासावर असलेल्या बंदीमुळे भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे असे सांगीतले आहे.

भारतीय संघ तीन डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधी दरम्यान चार कोसोटी सामने खेळणार आहे. यातील मध्ये पहिला सामना ब्रिस्बेन (3-7 डिसेंबर), एडिलेड (11-15 डिसेंबर), मेलबर्न (26-30 डिसेंबर) आणि सिडनी (3-7 जानेवारी) येथे खेळण्यात येणार आहे. 

“सध्या ठरवण्यात आलेले वेळापत्रक हे देशाच्या सीमा प्रवासासाठी खुल्या असतील असे गृहित धरुन बनवण्यात आला आहे, स्पर्धेच्या वेळी देशातील परिस्थीती ठिक नसेल तर या सामन्यांचे आयोजन दोन किंवा तीन जागांवर करावे लागू शकते. सध्या याविषयी काहीही सांगता येणार नाही. सध्या विविध पर्याय उपलब्ध आहेत, आपण चार प्रांतातील चार वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.” असे माहिती रॉबर्ट्स यांनी दिली. 

त्यापुढे रॉबर्ट्स यांनी सांगीतले की, जर टी20 विश्वकप आयोजन जर रद्द झाले तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला जवळपास आठ करोड ऑस्ट्रेलियाई डॉलरचे नुकसान होणार आहे. आयसीसीने टी20 विश्वचषक आयोजन करण्याविषयीचा निर्णय 10 जून पर्यंत पुढे ढकलाला आहे. जर विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तरी ही स्पर्धा बंध दाराआज प्रेक्षकांविना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमध्ये टी20 विश्वकप आयोजनाबद्दल अनिश्चीतात आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या