Asian Games 2018 : राणीची हॅटट्रिक; भारताचा थायलंडवर 5-0ने विजय

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

कर्णधार राणी रामपालच्या हॅटट्रीकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडवर 5-0 असा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. तसेच भारताने 12 गुणांसह ब गटातील अव्वल स्थानही कायम राखले आहे. 

जकार्ता : कर्णधार राणी रामपालच्या हॅटट्रीकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडवर 5-0 असा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. तसेच भारताने 12 गुणांसह ब गटातील अव्वल स्थानही कायम राखले आहे. 

पूर्वार्धात भारताला एकही गोल करता आला नाही. मध्यंतरानंतर कर्णधार राणीने दोन गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सहाव्या कॉर्नरवर मोनिकाने गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. 54 व्या मिनिटाला नवज्योत कौरने आणखी एक गोल केला. त्यानंतर राणीने आपला तिसरा गोल नोंदवत भारताला 5-0 अशा भक्कम आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात भारताला पीच कॉर्नर मिळाले परंतु त्यांना त्यावर एकही गोल करता आला नाही.  


​ ​

संबंधित बातम्या