World Cup 2019 : मैदानासोबत सोशल मीडियावरही पिपाणी वाजवणाऱ्या आजीबाईंचा धुमाकूळ

वृत्तसंस्था
Tuesday, 2 July 2019

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये केवळ तरूणच नाही तर अबालवृद्धांनी गर्दी केली आहे. अशाच एका आजीबाईंनी आज सामना सुरु असताना सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये केवळ तरूणच नाही तर अबालवृद्धांनी गर्दी केली आहे. अशाच एका आजीबाईंनी आज सामना सुरु असताना सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या.

आजीबाईंचा उत्साह बघून नेटकरीही या आजीबाईवर फिदा झालेले पाहायला मिळाले. अनेकांनी सोशल मिडियावर आजीबाईंबाबत प्रतिक्रीया दिल्या आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींची झलक टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले.
 

सुरवातीला समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली व हर्षा भोगले यांच्या निदर्शनास या आजीबाई आल्यावर त्यांना आजीबाईंची दखल घ्यावीशी वाटली. संपूर्ण विश्वकरंडकामधला सगळ्यात सुंदर क्षण जो कॅमेऱ्यानं टिपलाय अशा शब्दांमध्ये गांगुलीनं या आजीबाईंचं कौतुक केलं. त्यानंतर सोशल मिडियावर फक्त आजीबाईंचीच चलती होती हे विशेष!
 

 


​ ​

संबंधित बातम्या