माझ्या काळात फक्त 2-3 खेळाडूच यो-यो टेस्ट पास झाले असते : मोहम्मद कैफ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

मोहम्मद कैफ याला यो-यो टेस्ट बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

भारताच्या क्रिकेट संघातील माजी फंलदाज आणि कमालीचा चांगला फिल्डर राहिलेला क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने खळबळजणक दावा केला आहे. त्याच्या फिटनेससाठी ओळखला जाणारा कैफने तो खेळत असताना फक्त दोन-तिन खेळाडूच यो-यो टेस्ट पास करु शकले असते असे मत व्यक्त केले आहे. 

2002 साली क्रिकेट पदार्पण करत अंतराष्ट्रीय क्रिकेट करिअर सुरु केल्यानंतर कैफने भारतीय संघात महत्वाचे स्थान मिळवले होते. कैफ भारतीय संघात खेळत असताना भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू होते तेव्हा भारतीय संघात खेळाडूंच्या फिटनेसवर सध्या दिले जाते तेवढे लक्ष दिले जात नसे. पण तेव्हा देखील कैफचा फिटनेस मात्र लाजवाब होता. 

हॅलो सोशल मिडीया वेबसाईट चाहत्यांसोबत संवाद साधत असताना कैफ याला यो-यो टेस्ट बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचे उत्तर देताना कैफ म्हणाला की, “जर आमच्या वेळी ही टेस्ट असती तर मला वाटतं बालाजी आणि माझ्या व्यतीरिक्त युवराज सिंह हि टेस्ट पास करु शकला असता. पण या व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू ही टेस्ट पास करु शकला नसता.” ज्या कालावधीमध्ये कैफ भारतासाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता तेव्हा सौरव गांगुली संघाचा कर्णधार होता, तसेच सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड. वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, जहिर खान. अजीत अगरकर आणि आशिष नेहरा असे दिग्गज खेळाडू भारतीय संघात खेळत होते. 

"लॉकडाऊनमध्ये वडिलांना घेऊन केला 1200 कि.मी. सायकल प्रवास! सायकलिंग फेडरेशने दिली विशेष ऑफर"

मोहम्मद कैफने यासोबतच भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची सुस्ती देखील केली. “सौरव गांगुलीनी कमी काळामध्ये खूप चांगले निर्णय घेतले आहेत, क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणत व्यवस्थेत सकारात्मक बदल केले आहेत. त्यासाठी गांगुलीला एक वर्षाचा वाढीव कार्यकाळ मिळाला पाहिजे.” असे मत व्यक्त केले आहे.  कैफच्या नावावर 13 कसोटी सामन्यांमध्ये 624 धावा तर 125 एकदिवसीय सामन्यात 2753 धावा केल्या आहेत. तर वनडे करिअर मध्ये 2 शतक आणि 17 अर्धशतक केले आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या