..तर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियातही ढेपाळतील : पाँटिंग

वृत्तसंस्था
Friday, 21 September 2018

सिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून दोन महिने लांब असला, तरीही त्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठीचे रणशिंग आतापासूनच फुंकण्यात आले आहे. यात पहिले पाऊल उचलले आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनी. 'भारताची इंग्लंडमधील कामगिरी पाहता, चेंडू स्विंग झाला तर त्यांची फलंदाजी सहज कोलमडेल', असे विधान पॉंटिंग यांनी केले. 

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी लक्षणीय कामगिरी केली असली, तरीही फलंदाजांनी निराशा केली. पॉंटिंग यांनी याच गोष्टीवर बोट ठेवले. 21 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यास सुरवात होईल. त्यानंतर 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेस सुरवात होईल. 

'त्या मालिकेदरम्यान चेंडू स्विंग झाला, तर भारतीय फलंदाजांना धावा करणे अत्यंत अवघड होईल. इंग्लंड दौऱ्यातही हेच झाले. चेंडू स्विंग होण्यास सुरवात झाली, की भारतीय फलंदाज अडखळायचे. अशा वातावरणात भारतीय फलंदाज नेहमीच चाचपडत खेळतात', असे पॉंटिंग म्हणाले. अर्थात, भारतीय उपखंडात गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचीही तशीच अवस्था होते, असेही त्यांनी मान्य केले. 'उपखंडात पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देते आणि त्यावर खेळणे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरते', असे ते म्हणाले. 

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी आतूर आहे. गेल्या दौऱ्यात भारताला ऑस्ट्रेलियात एकही सामना जिंकता आला नव्हता. कोहली स्वत: भन्नाट फॉर्ममध्ये आहे. पण कर्णधार म्हणून त्याने घेतलेल्या निर्णयांवर टीका होत आहे. 

संबंधित बातम्या