मोहम्मद शमी लाळ न वापरता देखील बॉल रिव्हर्स स्विंग करु शकतो, पण..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

चेंडूवर लाळचा वापर केल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता वाढू शकते. 

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडी स्पर्धा बंद पडल्या आहेत आणि त्या पुन्हा सुरु करण्यासाठी क्रीडा संघटना प्रयत्न करत आहेत. क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी आयसीसी नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. कोरोना व्हायरस माहामारीनंतर स्थगीत करण्यात क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी अंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आसीसी)ने सामन्यादरम्यान चेंडू चमकावण्यासाठी त्यावर लाळेचा वापर करण्यास बंदी घालण्याचा विचार करत आहे. दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चेंडूवर लाळेचा वापर टाळून देखील बॉल रिव्हर्सं स्विंग करु शकतो पण त्यासाठी चेंडूची चमक कायम राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आहे. 

"वर्णभेदाच्या मुद्यावर केएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट"

चेंडूवर लाळचा वापर केल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता वाढू शकते.  पण लाळेचा वापर बंद केल्याने गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात अडचण येण्याची शक्यता क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत. शमीने नुकत्याच एका इंस्टाग्राम चॅट दरम्यान याविषयी बोलताना सांगीतले की, “लाहनपणी क्रिकेट खेळत असतानापासून चेंडूवर लाळ वापरण्याची सवय आहे. त्यामुळे अडचण येऊ शकते. पण चेंडूवरील चमक कायम ठेवली तर निश्चितपणे तो रिव्हर्स स्विंग होईल.” भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने खेळाडूंना चेंडू चमकवण्यासाठी वापर करण्याचा सल्ला दिला होता.

"भगव्या जर्सीतील टीम इंडियाचा तो पराभव हिरव्या जर्सीला अजूनही झोंबतोय"

पण शमी म्हणाला की घामाचा वापर केल्याने वेगवान गोलंदाजाना पुरेसी मदत मिळणार नाही.‘घाम आणि लाळ वेगवेघळ्या पध्दतीने काम करते. मला नाही वाटत की घाम वापरल्याने काही फायदा होईल. मी कधीच लाळ ल वापरता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोरोना व्हायरसमुळे लाळेचा वापर करणे बंद कराणे खूपच महात्वाचे झाले आहे.’ अशी माहिती शमीने दिली.
 


​ ​

संबंधित बातम्या