भारत-पाक सामन्यांना हजेरी लावणाऱ्या तरुणीची ओळख पटली

वृत्तसंस्था
Monday, 24 September 2018

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या सामन्यांना हजेरी लावणाऱ्या सुंदर तरूणीची. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे.

दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या सामन्यांना हजेरी लावणाऱ्या सुंदर तरूणीची. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला दोन्ही सामन्यांत सहज पराभूत केले आहे. पाकिस्तानचा संघ भारताच्या आव्हानापुढे कुठेच टिकू शकलेला नाही. पण, तरिही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक तरुणी सतत स्टेडियममध्ये दिसत आहे. या तरुणीवरून सोशल मीडियामध्ये मेमेज बनवून व्हायरल होत आहेत. पण, अखेर या पोस्टर गर्लही ओळख पटण्यात यश आले आहे. 
 

पाकिस्तानची हिरवी जर्सी घालून ती सामन्यांना हजेरी लावते. तिच्या ओळखीबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरल्या असल्या तरी तिचे नाव निव्या नावोरा असे असल्याचे सांगण्यात येत आहे. ती भारताचीही चाहती असून, तिला बॉलिवूडची विशेष आवड आहे. शाहरुख खाऩ हा तिचा आवडीचा अभिनेता आहे. तिच्या इन्टाग्राम अकाऊंटलाही 5 हजार फॉलोअर्स आहेत.

संबंधित बातम्या