ICC Test Ranking : किंग कोहली दुसऱ्या स्थानावर; मग अव्वल कोण? 

सुशांत जाधव
Tuesday, 18 August 2020

गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पेट कमिन्स 904 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय आणखी दोघांनी आघाडीच्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. नव्या कसोटी क्रमवारीत जलदगती गोलंदाज  जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नव्या स्थानावर घसरण झाली आहे.  कर्णधार विराट कोहली 886 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा (766) (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) (726) गुणांसह अनुक्रमे आठवे आणि दहाव्या स्थानावर आहेत. आस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मित कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहची आठव्या स्थानवरुन नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजाने तिसरे स्थान कायम राखले आहे. साउथहॅम्पटनमध्ये इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना अर्णित ठरला. इंग्लंडमधील कामगिरीच्या जोरावर पाकच्या बाबर आझमने कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोच्च पाचव्या रँकिंगवर पुन्हा कब्जा मिळवलाय. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनला मोठा फायदा मिळाला असून  ब्रॉड दुसऱ्या तर अँड्रसन चौदाव्या स्थानावर आहे.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पेट कमिन्स 904 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि इंग्लंड कर्णधार जो रुट अनुक्रमे सातव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. भारताच्या खात्यात 360 गुण जमा आहेत. त्यापाठोपाठ 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. इंग्लंडने 279 गुण मिळवले आहेत. या यादीत पाकिस्तान 153 गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत.


​ ​

संबंधित बातम्या