चेंडूला चमकावण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणे गरजेचे - भुवनेश्वर कुमार

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

कोरोनाची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमात तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये चेंडूला चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या या निर्णयावर भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नापसंती व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या आजारामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून क्रिकेटजगत पूर्णतः थांबले होते. त्यानंतर पुन्हा सावरत का होईना खेळाचे आयोजन सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमात तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये चेंडूला चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या या निर्णयावर भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नापसंती व्यक्त केली आहे. गोलंदाजाला चेंडू स्विंग करण्यासाठी चमकणे आवश्यक असल्याने, आयसीसीने यावर लवकरच दुसरा पर्याय देणे गरजेचे असल्याचे भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. 

सामन्यात चेंडूची चमक टिकून रहावी म्हणून, तसेच चेंडूला स्विंग करण्यासाठी खेळाडू आपल्या लाळेचा वापर करतात. परंतु सध्या जगभरात करोनाचे संकट आहे. त्यामुळे याचा फटका क्रिडा क्षेत्राला देखील बसला असून, कोरोनाची खबरदारी म्हणून आयसीसीने खेळण्याच्या नियमांमध्ये अंतरिम बदलांची पुष्टी केली होती. ज्यामध्ये चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आयसीसीच्या या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी गोलंदाज वसीम अक्रमने आयसीसीच्या या निर्णयावर तोंडसुख घेताना, यामुळे गोलंदाज रोबोट होणार असल्याचे म्हटले होते. तसेच भारतीय क्रिकेट संघातील जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी देखील या निर्णयामुळे फलंदाजांना अधिक फायदा होणार असल्याचे म्हटले होते.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहिती आहेत का ?

 त्यानंतर आता भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एका वेबसेमिनार दरम्यान, चेंडूला स्विंग करण्यासाठी चमकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयसीसी चेंडू चमकण्यासाठी काही कृत्रिम पदार्थ आणेल, अशी आशा भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली. इंग्लंडसारख्या ठिकाणी खेळताना गोलंदाजाला चेंडू स्विंग करण्यासाठी अधिक गरज भासणार असल्याचे भुवनेश्वरने म्हटले आहे. वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकी गोलंदाजांनी देखील चेंडू वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे भुवनेश्वरने सांगून, आयसीसीने यावर लवकरच दुसरा पर्याय देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहने आयसीसीकडून चेंडूला चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी घालण्यात आल्याने सामन्यातील परिस्थिती फलंदाजांसाठी अधिक अनुकूल होणार असल्याचे म्हटले होते. तर, इशांत शर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी देखील या निर्णयाचा फलंदाजांना लाभ होणार असल्याचे म्हटले होते.

आता फॉर्म्युला वन गाड्यांचा आवाज पुन्हा घुमणार                      

दरम्यान, कोरोना काळानंतर क्रिकेट सामने पुन्हा चालू करताना गोलंदाजांनी चेंडूला स्विंग करण्यासाठी, तसेच चमक आणण्यासाठी आपल्या थुंकीचा वापर केल्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर यावर उपाय म्हणून आयसीसीने नेमलेल्या अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. 
 

 


​ ​

संबंधित बातम्या