आयसीसी 10 जूनला घेणार टी-20 विश्वचषकाचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

विश्वचषकाचे आयोजन 18 ऑक्टोबर ते 15 नोहेंबर दरम्यान करण्यात येणार होते

कोरोना व्हायरसमुळे जगभारतील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत, कितीतरी पुर्वनियोजीत स्पर्धा स्थगीत करण्यात आल्या असून त्यांच्या भवितव्याबद्दल अनिश्चीतता आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया मध्ये नियोजीत टी-20 विश्वकप स्पर्धा देखील कोरोना व्हायरस माहामीरीमुळे अडचणीत सापडली आहे. गुरुवारी आयसीसीच्या बैठकीत टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेतला जाणार होता. मात्र अंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी) बोर्डने ऑस्ट्रेलिया मध्ये आयोजीत होणाऱ्या टी-20 विश्वचषकबद्दल अंतिंम निर्णय 10 जून पर्यंत स्थगीत केला आहे. ऑनलाईन झालेल्या बैठकी दरम्यान विश्वचषक तसेच इतर सर्व मुद्द्यांवर जून महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. 

विश्वचषकाचे आयोजन 18 ऑक्टोबर ते 15 नोहेंबर दरम्यान करण्यात येणार होते, पण कोरोना व्हायरस माहामारीमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात येईल तसेच य़ा कालावधीमध्ये इंडीयन प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात येईल अशी जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात सुरु होती. मात्र टी-20 विश्वचषक स्पर्धेचा निर्णय पुढे ढकलल्याने सध्यातरी विश्वचषक तसेच आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं भवितव्यही अजुन अधांतरीच आहे. याआधी या बैठकीनंतर ऑस्ट्रेलियात होणाया टी-20 विश्वचषक स्पर्धेस 2022 पर्यंत स्थगीत करण्यात येईल अशी शक्यता देखील वर्तवन्यात येत होती.
 


​ ​

संबंधित बातम्या