2023 मधील वर्ल्डकप पात्रतेसाठी आयसीसीकडून सुपर लीगची घोषणा  

टीम ई-सकाळ
Monday, 27 July 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आज सोमवारी एकदिवसीय सुपर लीगची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आज सोमवारी एकदिवसीय सुपर लीगची घोषणा केली आहे. 2023 मध्ये भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी सुपर लीगचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या या प्रसिद्धीपत्रकात यजमान भारतासह सुपर लीगमध्ये पहिल्या सात क्रमांकावर राहणाऱ्या संघांना 2023 मधील वर्ल्ड कपसाठी थेट प्रवेश मिळणार असल्याचे म्हटले आहे. 

ENGvsWI 3rd Test :स्टुअर्ट ब्रॉडच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत 

आयसीसीने प्रस्तावित केलेल्या या सुपर लीगची सुरुवात विश्वविजेता संघ इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेपासून होणार आहे. या दोन्ही देशांमधील एकदिवसीय मालिका 30 जुलैपासून साऊथॅम्प्टन येथे खेळली जाणार असून, उर्वरित कार्यक्रमाची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसीच्या विश्वचषक 2023 मधील पात्रता खेळीचे सामने धोक्यात असल्याकारणामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे, आयसीसीचे अधिकारी  जिओफ अलार्डिस यांनी सांगितले. तसेच या सुपर लीगच्या पात्रता फेरीमुळे पुढील तीन वर्षांत एकदिवसीय क्रिकेटला अर्थपूर्ण आणि प्रासंगिक साह्य मिळणार असल्याचे जिओफ अलार्डिस यांनी म्हटले आहे. 

पुढील वर्षाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आयोजकांनी घेतले मोठे निर्णय 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी -20 प्रकाराचा उदय झाल्यामुळे, कसोटी क्रिकेटला सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांना धोका निर्माण झाल्याचे म्हणत, 50 षटकांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सुपर लीग मध्ये आयसीसीचे सदस्य असलेले 12 संघ व नेदरलँड सहभागी होणार आहे. नेदरलँडच्या संघाने 2015-17 मध्ये वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग जिंकून सुपर लीगमध्ये स्थान मिळवले आहे. सुपर लीगमधील प्रत्येक संघ घरातील तीन आणि परदेशात चार मालिका खेळणार आहे.  

 


​ ​

संबंधित बातम्या