दौऱ्यावर येताना या खेळाडूला घेऊन या! ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भावना

टीम ई-सकाळ
Sunday, 7 June 2020

या वर्षीच्या अखेरीस भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा या मालिकेवर परिणाम होणार का? असा प्रश्नही काही जणांना पडला आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी विराट सेनेला एक खास सलाला दिला आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाने हार्दिक पांड्याला संधी द्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. 2018 पासून हार्दिक पांड्या कसोटी संघातून बाहेर आहे. पाठिच्या दुखापतीतून सावरुन तो संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.लॉकडाउनची परिस्थिती निवळल्यानंतर तो भारतीय संघासोबत दिसेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. त्यात आता इयान चॅपल यांनी हार्दिक पांड्याच्या सहभागाने भारताची ताकद वाढेल, असे म्हटले आहे.    

#वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

या वर्षीच्या अखेरीस भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा या मालिकेवर परिणाम होणार का? असा प्रश्नही काही जणांना पडला आहे. मात्र आयोजक मालिका घेण्याबाबत सकारात्मक दिसत आहेत. या दौऱ्यासाठी भारताने हार्दिक पांड्याला संघात घ्यायला हवे, असे मत इयान चॅपल यांनी व्यक्त केले आहे. चॅपल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या लेखातून यावर आपले मत व्यक्त केले आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी अतिरिक्त गोलंदाजाची उत्तम भूमिका बजावू शकतो. त्यामुळे यजमानांपुढे भारताला आव्हान निर्माण करता येईल, असा उल्लेख चॅपल यांनी केला आहे.

पाकच्या या क्रिकेटरला टीम इंडियाच्या ताफ्यासोबत फिरायचंय

पाठिच्या दुखापतीतून सावरुन पुन्हा कसोटीमध्ये आपली क्षमता सिद्ध करणे मोठे आव्हान असल्याचे खुद्द पाडंयाने यापूर्वी म्हटले होते. चॅपल यांनी पांड्याला दिलेली पसंती ही त्याच्यासाठी एक चांगले संकेत आहेत.  
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीतील ताकदीवरही त्यांनी भाष्य केले आहे. पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि जेम्स पॅटिनसन यासारखे तगडे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात आहेत. फिरकीपटू नॅथन लायन हा संघासाठी मोलाची कामगिरी बजावण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज  विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला रोखण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  


​ ​

संबंधित बातम्या