जागतिक मैदानी स्पर्धा : IAAFनेही घेतला तापमान व दमटपणाचा धसका

नरेश शेळके
Friday, 27 September 2019

येथील जीवघेण्या तपमान व दमटपणाचा धसका केवळ अॅथलिट्सेनच घेतला नाही तर आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघानेही (आयएएएफ) घेतला आहे. आयएएएफने अचानक दुपारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार महिला मॅरेथॉन स्पर्धा निर्धारीत वेळेत सुरु होईल.

दोहा : येथील जीवघेण्या तपमान व दमटपणाचा धसका केवळ अॅथलिट्सेनच घेतला नाही तर आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघानेही (आयएएएफ) घेतला आहे. आयएएएफने अचानक दुपारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार महिला मॅरेथॉन स्पर्धा निर्धारीत वेळेत सुरु होईल.

मात्र, आयएएएफच्या वैद्यकीय प्रतिनीधीच्या सुचनेनंतर वेळ बदलायची की नाही, याविषयी रात्री 10.30 (स्थानिक वेळेनुसार) माहिती देण्यात येईल. स्पर्धेपूर्वी आणि शर्यती दरम्यान एखाद्या अॅथलिट्सला अधिक ताण जाणवत असेल तर सबंधीत अॅथलिट्सला स्पर्धेतून काढून घेण्याचा अधिकार या वैद्यकीय प्रतिनीधींना देण्यात आला आहे. याच कारणामुळे मध्यरात्री शर्यत आयोजित करूनही आयएएएफ कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही.

वेट बल्ब ग्लोब टेंम्परेचरनुसार आजच्या शर्यतीदरम्यान तपमान 3० अंशाच्या खाली राहिल, जे शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या निर्धारीत मर्यादेमध्ये आहे (28 ते 30.9 अंश). अशा तपमानात कसे धावायचे किंवा कसा सामना करायचा यासंदर्भात आयएएएफच्या आरोग्य आणि विज्ञान विभागाकडून सर्व देशाच्या महासंघाला जून महिन्यात विस्तृत माहिती पाठविण्यात आली होती. या शर्यतीत आता एकूण 71 महिलांनी प्रवेश निश्चित केला असून त्यापैकी किती जणी शर्यत पूर्ण करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या