सर्वोत्तम भारतीय गोलंदाजीचा सामना केला: मोईन अली

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

लंडन : सध्याचा भारतीय संघाचा गोलंदाजीचा ताफा हा मी आतापर्यंत खेळलेल्या गोलंदाजांपैकी सर्वोत्तम असल्याचे मत इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने व्यक्त केले आहे.

भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात मोईन अलीने आपली अष्टपैलू कामगिरी कायम ठेवली. त्याने एकामागून एक फलंदाज बाद होत असताना अर्धशतक झळकाविले. चौथ्या कसोटीतही त्याच्या फिरकीच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवित मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यापासून इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळविणाऱ्या  भारतीय गोलंदाजांचे कौतुक होत आहे. आता मोईन अलीनेही सर्वोत्तम गोलंदाजांची फळी असल्याचे म्हटले आहे.

मोईन अली म्हणाला, की मी अनेकवेळा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला, पण गोलंदाजी सर्वोत्तम होत होती. खेळपट्टीवर चेंडूची सतत हालचाल होत होती. भारतीय गोलंदाजांनी मला मोठे फटके मारण्यापासून रोखले. मी तशीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. भारताच्या जलदगती गोलंदाजांची फळी चांगली आहे.

​ ​

संबंधित बातम्या