खेलरत्न' पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

टीम ई-सकाळ
Monday, 1 June 2020

बीसीसीआयने रोहितचा एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित  खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित केल्याबद्दल बीसीसीआय, टीम आणि चाहते व कुटुंबाचे आभार मानताना पाहायला मिळते.         

मुंबई : क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर्षी धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. त्यानंतर रोहितने बीसीसीआय आभार मानले आहेत. बीसीसीआयने रोहितचा एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित  खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित केल्याबद्दल बीसीसीआय, टीम आणि चाहते व कुटुंबाचे आभार मानताना पाहायला मिळते.         

संगकारा म्हणाला, गोंधळ धोनीमुळे झाला नव्हता तर,...

रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीबद्दल बीसीसीआयने यावर्षी 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कारासाठी रोहित शर्माची निवड केली आहे. २०१९ मधील विश्वचषक दरम्यान रोहित शर्माने पाच शतके झळकावली होती. त्यामुळे विश्वचषक सामन्यांच्या संपूर्ण इतिहासात सर्वाधिक शतके नोंदवण्याचा हा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला होता. यासोबतच ट्वेन्टी-२० सामन्यांत चार शतके आणि कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून दुहेरी शतक करणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू आहे. त्याच्या याच कामगिरीला लक्षात घेऊन  बीसीसीआयने खेलरत्नसाठी रोहित शर्माची शिफारस केल्याचे म्हटले होते. यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा हा उत्तम फलंदाज असल्याचे सांगत रोहित शर्मा हा या पुरस्कारासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. तर रोहित शर्माने  'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कारासाठी नामांकन झाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.    

या स्पर्धेनं याठिकाणी रंगणार 'फॉर्म्युला वन रेस'चा थरार, पण...

 यापूर्वी १९९८ साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, २००८ मध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि २०१८ मध्ये विराट कोहली यांना खेलरत्नने गौरविण्यात आले आहे. तसेच यावेळी बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी इशांत शर्मा, शिखर धवन आणि दीप्ती शर्मा यांची नावे सुचविली आहेत.


​ ​

संबंधित बातम्या