कोरोना व्हायरसमुळे हैद्राबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

11 ते 16 ऑगस्ट दरम्यान स्पर्धेचे आयोजन होणार होते.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे, या माहामारीचा थेट परिणाम क्रीडा विश्वावर पडताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धां रद्द होण्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. यावेळी कोरोना व्हायरसचा धोका पाहाता विश्व बॅडमिंटन महासंघ (बीडब्लूएफ)ने 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजीत करण्यात आलेली हैद्राबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीडब्लूएफ आणि भारतीय बॅडमिंटन संघ यामा विश्व बॅडमिंटन महासंघ च्या एक सुपर 100 स्पर्धा हैद्राबाद ओपन 2020 स्पर्धा रद्द करण्याचा संयुक्तपणे निर्णय घेतल्याचे बीडब्लूएफने प्रसिध्द केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. हैद्राबाद ओपन ही स्पर्धा मार्च महिन्यात स्थगीत केलेल्या स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी आखण्यात आलेल्या सुधारीत कार्यक्रमाचा भाग होती.

"सारे मिळून अशा भेकडवृत्तीला संपवूया! त्या घटनेवर विराट प्रतिक्रिया"

“काही देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थीती बदलत आहे. तर काही ठिकाणी अद्याप त्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार बीडब्लूएफला स्पर्धांच्या नियोजनाबद्दल निर्णयांचा फेरविचार करावा लागत आहे” अशी माहिती बीडब्लूएफचे सचिव थॉमस लुंड यांनी दिली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया ओपन आणि कोरिया मास्टर्स या दोन स्पर्धा देखील कोरोना व्हायरस या जागतीक संकटाचा धोका लक्षात घेत बीडब्लूएफने रद्द केल्या आहेत. 

 


​ ​

संबंधित बातम्या