थम्स अप पितोय म्हणून पदासाठी अपात्र कसे? गांगुली यांचा खास किस्सा

सुशांत जाधव
Friday, 24 July 2020

999 मध्ये कर्णधार सचिन तेंडुलकर आणि उप-कर्णधार अजय जडेजाच्या अनुपस्थितीत गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. यावेळी ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील विंडीजला त्याच्या घरात 2-1 असे पराभूत करुन भारतीय संघ मायदेशी परतला होता.

भारतीय संघाची बांधणी करण्याचे मोलाचे काम विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी केले. 1999 च्या विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवानंतर नेतृत्वाचा खांदेपालट झाल्याचे पाहायला मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतीय संघाचा कर्णधार झाला. ऑस्ट्रेलियादौरा आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सचिन खुद्द दबावात दिसला. आणि त्याने कर्णधारपद जमणार नसल्याचे सांगत राजीनामा दिला. सचिनने कर्णधारपद  सोडल्यानंतर गांगुली संघाच्या नेतृत्वासाठी पहिली पसंती होती. कारण चार वर्षे तो संघाचा नियमित सदस्य होता. शिवाय 1999 मध्ये कर्णधार सचिन तेंडुलकर आणि उप-कर्णधार अजय जडेजाच्या अनुपस्थितीत गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. यावेळी ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील विंडीजला त्याच्या घरात 2-1 असे पराभूत करुन भारतीय संघ मायदेशी परतला होता. अनिल कुंबळे आणि अजय जडेजा हे दिग्गज  संघात असताना गांगुली कर्णधार झाला. पण यापूर्वी उप-कर्णधार करण्यावरुन त्याला अपात्र ठरवण्यात आले होते.   

दृष्टीकोनामुळेच बंगालची हूकुमत प्रशिक्षक शब्बीरअली ; हेडिंगसाठी टायमिंग महत्वाचे

भारतीय क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अशोक मल्होत्रा यांनी गांगुलीची भारतीय संघाच्या उप-कर्णधारपदी केलेल्या नियुक्तीचा किस्सा शेअर केलाय. त्याची उप-कर्णधारपदी निवड करणे खूप कठिण काम होते. कोलकातामध्ये त्याला उप-कर्णधारपदी नियुक्ती केली होती. प्रशिक्षकाला त्याच्याविषयी आक्षेप घेण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. तो दुहेरी धाव घेण्यात कमी पडतो. कोक अधिक पितो, यासारखे प्रश्न होते. पण थम्स अप त्याला उपकर्णधारासाठी अपात्र ठरवू शकत नाही, असे मत मांडले होते, असा किस्सा मल्होत्रा यांनी स्पोर्ट्स कीडासाठी दिलेल्या फेसबुक मुलाखतीमध्ये शेअर केला. 
1999 मध्ये कोलकातामध्ये झालेल्या बैठकीत गांगुलीला 3-2 मतांनी उप-कर्णधार करण्याबाबतचा निर्णय झाला. पण त्यावेळी इतिहासात पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षांनी  निवड प्रक्रियेच्या बैठकीला हजेरी लावली. त्यावेळी एका निवड समितीच्या सदस्याने गांगुलीच्या निवडीला नकार दिला होता. त्यामुळे  त्यावेळी उप-कर्णधार पदी नियुक्त करण्यात अडचण आली होती.  

फुटबॉल कॉर्नर : टॅलेंट भरपूर, प्रशिक्षण योग्य वेळी हवे 

गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होईल याचा कोणालाही अंदाजा नव्हता. कारण त्यावेळी सचिन भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. सचिनने राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळे आणि अजय जडेजा यांची नावे शर्यतीत होती. त्यांना डावलून गांगुलीकडे नेतृत्व देण्यासाठी इतरांचे मन वळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती, असेही त्यांनी सांगितले.  2000 मध्ये गांगुलीने पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले. आयसीसी नॉकआउट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचला. पण अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयाने गांगुलीच्या नेतृत्वाची दमदार सुरुवात झाली. सध्याच्या घडीला त्याला यशस्वी कर्णधारामध्ये गणले जाते.  


​ ​

संबंधित बातम्या