कसा होत गेला धोनी प्रगल्भ...सांगतोय इरफान पठाण

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणारा इरफान पठाण धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 च्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक आणि 2013 मधील चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघाचा शिलेदार होता. या काळात धोनी नेतृत्वात कसा प्रगल्भ होत गेला हे इरफानने कथन केले आहे.

मुंबई : कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंग धोनी गोलंदाजांना दिशा दाखवण्याचे काम करायचा, पण उत्तरोत्तर याच गोलंदाजांवर तो विश्‍वास दाखवायला लागला, असे धोनीच्या कर्णधार पदाबाबतचे निरीक्षण माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने नोंदवले आहे. टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणारा इरफान पठाण धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 च्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक आणि 2013 मधील चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघाचा शिलेदार होता. या काळात धोनी नेतृत्वात कसा प्रगल्भ होत गेला हे इरफानने कथन केले आहे. 2007 मध्ये ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी धोनीकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले, तेव्हा तो अर्थातच फारच उत्साही असायचा.

जिममध्ये जायचय? अगोदर हे वाचा 

गोलंदाजांना काही सांगायचे असल्यास तो यष्टीरक्षणाच्या जागेवरून थेट गोलंदाजांपर्यंत यायचा, पण 2013 पर्यंत तो गोलंदाजांनाच स्वतःला सावरायची संधी देऊ लागला, त्यांच्यावरच विश्‍वास टाकायचा, एकूणच तो उत्तरोत्तर अधिक संयमी होत गेला. पण इतक्‍या वर्षांतही त्याची टीम मिटिंग केवळ पाच-सहा मिनिटांचीच घेण्याची सवय मात्र कायम राहिली, असे इरफानने सांगितले. आयसीसीचे तिन्ही करंडक (ट्‌वेन्टी-20, एकदिवसीय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा धोनी हा क्रिकेट विश्‍वातील एकमेव कर्णधार आहे. सतत नवनवे बदल करणाऱ्या धोनीने फिरकी गोलंदाजांवरही तेवढाच विश्‍वास दाखवायला सुरुवात केली होती. कठीण परिस्थितीत तो फिरकी गोलंदाजांचा खुबीने वापर करायचा. 2013 च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात अश्‍विनचा त्याने हुशारीने वापर करून विजय मिळवला होता, अशी आठवण पठाणने सांगितली. 

शोएबनं सानियाच्या डोळ्यादेखत केल माहिराशी फ्लर्ट; मग काय चर्चा तर होणारच

धोनीच्या कर्णधारपदाचे सुवर्णयश 
- 2007 : ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक 
- 2010, 2016 : आशिया करंडक 
- 2011 : 50-50 षटकांचा विश्‍वकरंडक 
- 2011 : कसोटी क्रमवारीत भारताला अव्वल स्थान 
- 2013 : चॅम्पियन्स करंडक


​ ​

संबंधित बातम्या