भारताचा पहिला सामना हाँग काँगशी; हाँग काँग आशिया करंडकासाठी पात्र

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

आशियाई स्पर्धाच्या पात्रता फेरीत संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग यांच्याच झालेल्या अंतिम सामन्यात हाँग काँगने दोन गडी राखत विजय मिळवला आहे. या विजयासह हाँग काँगचा संघ आशिया करंडकासाठी पात्र झाला आहे. 

लूंपर : आशियाई स्पर्धाच्या पात्रता फेरीत संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग यांच्याच झालेल्या अंतिम सामन्यात हाँग काँगने दोन गडी राखत विजय मिळवला आहे. या विजयासह हाँग काँगचा संघ आशिया करंडकासाठी पात्र झाला आहे. 

प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातीने जोरदार सुरवात केली. सहा षटकांत त्याने नाबाद 64 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र सातव्या आणि आठव्या षटकांत सलग तीन फलंदाज बाद झाले. यामुळे त्यांच्या धावगतीला खिळ बसला. पावसामुळे सामना 24 षटकांचा करण्यात आला. हाँग काँगने 24 षटकांत नऊ बाद 176 धावा केल्या. हाँग काँगकडून सलामीवीर अश्फाक अहमद याने 79 धावा केल्या. 

सलामीवीर निझाकत खान आणि आयुष्यमान राठ यांनी केलेल्या 60 धावांच्या भागीदारीने हाँग काँग हे आव्हान तीन दोन फलंदाज राखून पार केले आणि आशिया करंडकात आपले स्थान नक्की केले. 

हाँग काँगचा पहिला सामना 16 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. भारतही आपला पहिला सामना हाँग काँगविरुद्ध खेळेल. हा सामना 18 सप्टेंबरला दुबई आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या