हॉंगकॉंग ओपन - सिंधू, प्रणॉय, कश्यपचा विजय, मात्र साईना, वर्मा पहिल्याच फेरीत गारद

वृत्तसंस्था
Wednesday, 13 November 2019

- पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय यांनी हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जोरदार सुरुवात केली

-  साईना नेहवाल, समीर वर्मा सलामीलाच पराजित

मुंबई -  पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय यांनी हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जोरदार सुरुवात केली; पण त्याचवेळी साईना नेहवाल, समीर वर्मा सलामीलाच पराजित झाल्याने काहीशी निराशा आली होती; पण पारुपली कश्‍यपने जागतिक क्रमवारीत बाराव्या असलेल्या केंता निशिमोतो याला हरवून सुखद धक्का दिला. 
सिंधूने जागतिक क्रमवारीत 19व्या असलेल्या किम गा एऊन हिच्याविरुद्धच्या विजयाची औपचारिकता 21-15, 21-15 अशी पूर्ण केली. प्रणॉयने चीनच्या हुआन यु झिआंग याचा 21-12, 21-17 असा पाडाव केला. जागतिक विजेत्या सिंधूने 36 मिनिटांतच बाजी मारली. काही आठवड्यांपूर्वी डेंगी झालेल्या प्रणॉयचा सहज विजय सुखावणारा होता. 
साईना नेहवाल पुन्हा एकदा चीनच्या काई यान यान हिच्याविरुद्ध पराजित झाली. तिला 13-21, 20-22 पराभव पत्करावा लागला. साईनाला हा गेल्या सहापैकी पाच स्पर्धांत पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली आहे. समीर वर्माला वॅंग झू वेईविधू 11-21, 21-13, 8-21 पराभव स्वीकारावा लागला. अश्विनी पोनप्पा - एन. सिक्की रेड्डी यांना पुन्हा पहिली फेरी पार करण्यात अपयश आले. 
 


​ ​

संबंधित बातम्या