क्रिकेट

आयसीसीच्या क्रमवारीत जॉनी बेयरस्टोनची अव्वल दहामध्ये झेप  

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून जगजेत्या इंग्लंडला नमवत मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेतील पहिला सामना 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोने या सामन्यात 84 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. यानंतर तिसऱ्या व अंतिम सामन्यात देखील जॉनी बेयरस्टोने 126 चेंडूत 112 धावांची शतकी पारी खेळली होती. त्यामुळे जॉनी बेयरस्टोने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल...

टेनिस

सिमोना हालेपने पहिल्यांदाच जिंकली इटालियन ओपन   

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हचा पराभव करत यंदाच्या इटालियन ओपन स्पर्धेच्या खिताबावर मोहोर उठविली आहे. इटालियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यात कॅरोलिना प्लिस्कोव्हने दुसऱ्या सेट मध्ये माघार घेतल्यामुळे सिमोना हालेपने या फायनल मध्ये विजयाची नोंद केली.  ऑक्सिजन सिलेंडरविना 10 वेळा एव्हरेस्टवर चढणाऱ्या अंग रिटा शेर्पा यांचे निधन  सिमोना हालेप आणि कॅरोलिना प्लिस्कोव्ह यांच्यातील सामना सुरु झाल्यानंतर सिमोना हालेपने...

फुटबॉल

सेरी ए फुटबॉल लीग : नेपोली व परमा यांच्यातील सामन्यात प्रेक्षकांनी...

सेरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत झालेल्या सामन्यात नापोली संघाने परमावर 2-0 ने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच नापोली संघाने 3 अंक मिळवत क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. नेपोली आणि परमा यांच्यात झालेल्या या सामन्यात स्टेडिअमवर प्रेक्षक देखील उपस्थित होते.  नेपोली आणि परमा यांच्यातील सामन्यात खेळाच्या पहिल्या सत्रात कोणत्याच संघाला गोल नोंदवता आला नाही. मात्र त्यानंतर नेपोली संघातील ड्रायझ मर्टेन्सने 63 व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर लोरेन्झो इंसिग्नेने 77 व्या मिनिटाला गोल करत नेपोली संघाला 2-0 ने बढत...

बॅडमिंटन

अव्वल खेळाडूंसाठी लीग सारख्या स्पर्धा सुरू कराव्यात - पुलेला गोपीचंद

भारतीय बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी देशात खेळ सुरू होण्याच्या दृष्टीने अनेक लहान लीग आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या लीगमध्ये शीर्ष क्रीडापटूंसाठी जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करून पुन्हा खेळाला सुरवात करण्याची गरज असल्याचे मत पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये गोपीचंद बोलत होते. इटालियन टेनिस स्पर्धा: 18 वर्षीय नवोदितासमोर तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता पराभूत यावेळेस  पुलेला गोपीचंद यांनी, शारीरिक...

लोकल स्पोर्ट्स

फुटबॉलच्या सरावास भारतातही सुरुवात 

कोलकाता : कोरोना महामारीमुळे सर्वच सांघिक खेळांचा सराव बंद करण्यात आला आहे. मात्र मोहमेडन स्पोर्टिंगने सराव सुरू केला आहे. एकत्रित सराव सुरू करणारा मोहमेडन हा देशातील पहिला फुटबॉल क्‍लब ठरला आहे, असे क्‍लबने म्हटले आहे.  रोहित शर्माने पत्नी रितिकासह सुरु केला वर्कआऊट   सरावाच्या पहिल्या दिवशी क्‍लबच्या परंपरेनुसार नव्या खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. या शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर सर्व खेळाडूंचा जैवसुरक्षित वातावरणात कल्याणी येथील स्टेडियमवर सराव होणार आहे...

इतर स्पोर्ट्स

ऑक्सिजन सिलेंडरविना 10 वेळा एव्हरेस्टवर चढणाऱ्या अंग रिटा शेर्पा...

जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एव्हरेस्टवर ऑक्सिजन सिलेंडरविना 10 वेळा चढलेले नेपाळचे गिर्यारोहक अंग रिटा शेर्पा यांचे आज निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. अंग रिटा शेर्पा हे 72 वर्षांचे होते. अंग रिटा शेर्पा यांना 'स्नो लेपर्ड' म्हणून ओळखले जात होते. पर्वतारोहणातील कौशल्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते.     विराटला फेव्हरेट मानणाऱ्या वॉर्नरच्या लेकीचा सनरायझर्ससाठी खास संदेश (Video) आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास अंग रिटा...