महिला हॉकी संघ सुवर्णपदकांच्या दिशेने

मीररंजन नेगी 
Wednesday, 29 August 2018

सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय महिला हॉकी संघ लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकेल. थेट ऑलिंपिक प्रवेशाचेही बक्षीस असलेल्या भारतीय हॉकी संघांसाठी अखेरच्या दोन लढती साखळी सामन्यांच्या तुलनेत खूपच महत्त्वाच्या असतील.

सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय महिला हॉकी संघ लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकेल. थेट ऑलिंपिक प्रवेशाचेही बक्षीस असलेल्या भारतीय हॉकी संघांसाठी अखेरच्या दोन लढती साखळी सामन्यांच्या तुलनेत खूपच महत्त्वाच्या असतील. खेळातील अनिश्‍चितता लक्षात घेतली तरीही भारतीय महिला चीनचे आव्हान सहज परतवतील, याबाबत सर्वांनाच खात्री आहे. साखळीत आशियाई चॅंपियन्स विजेत्या कोरियाला हरवून भारताने आपली उपांत्य फेरीच नाही, तर गटविजेतेपदही पक्के केले. हे लक्षात घेतल्यास भारतासमोर आता किती आव्हान असेल हा प्रश्‍नच आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत पराजित होत असताना प्राथमिक फेरीतच गारद झाले. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना अव्वल दहा खेळाडूंना विश्रांती दिल्याची चर्चा त्या वेळी होती; पण या स्पर्धेतही उपांत्य फेरीसाठी चीनला संघर्ष करावा लागला आहे. त्याचवेळी भारतीय संघ चांगलाच बहरात आहे. आता 5-0 विजयही रसिकांना सफाईदार वाटत नाही, त्यावरूनच खूप काही दिसते. 
भारतीय आक्रमकांना चांगला सूर गवसला आहे. पेनल्टी कॉर्नरवर गुरजितने अखेरच्या मिनिटात केलेले गोल पाहून प्रतिस्पर्धी धास्तावले नसतील तरच नवल आहे. गर्दी करून खेळणाऱ्या चिवट कोरियाविरुद्धचे गोल प्रयत्नातील 80 टक्के यश नक्कीच सुखावणारे आहे.

आता एक गोष्ट खरी आहे, की धडाकेबाज आक्रमणामुळे भारतीय बचावफळीचा किंवा गोलरक्षिकेचा पुरेसा कस लागला नाही; पण सविताचा अनुभव पाहता ही चिंतेची बाब नसेल. मला नवोदित तसेच अनुभवी खेळाडू मैदानावर उतरल्यावर सारख्याच वेगाने खेळतात हे पाहून जास्त कौतुक वाटते. चौदा वर्षे संघात असलेल्या दीपिकाचा कमी न झालेला वेग नवोदितांसाठी प्रेरणादायकच आहे. कर्णधार राणी रामपालने तीन गोल करीत जोशात पुनरागमन केले. यापूर्वीच्या स्पर्धांत पुरुष जिंकल्यावर त्यापाठोपाठ महिला जिंकत असल्याचे चित्र साखळीत दिसत असे, या वेळी स्पर्धा कार्यक्रमात महिला आघाडीवर आहेत. त्या चांगले नेतृत्वही करीत आहेत. एकंदरीत भारतीय महिला हॉकी संघ एशियाडची राणी होण्याचीच चिन्हे दिसत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या