तैवानच्या स्यू-वेईची  नाओमी ओसाकावर मात 

वृत्तसंस्था
Monday, 25 March 2019

मायामी, फ्लोरिडा : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाला मायामी टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या फेरीत तिला तैवानच्या ह्‌सिह स्यु-वेई हिने 4-6, 7-6 (9-7), 6-3 असे पराभूत केले. नाओमीने गेल्या सलग दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे तिचा पराभव अनपेक्षित ठरला. स्यू-वेई 33 वर्षांची आहे, तर नाओमीचे वय 21 आहे.

"हा विजय म्हणजे अत्यंत भावोत्कट क्षण आहे. अव्वल प्रतिस्पर्धीला केव्हाही हरविले तरी ती कामगिरी अनोखी असते,' असे स्यू-वेई म्हणाली. अन्य लढतींत दुसऱ्या क्रमांकावरील पेट्रा क्विटोवाने क्रोएशियाच्या डॉना वेकीचला 6-4, 3-6, 6-4 असे हरविले.

आता तिची फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाविरुद्ध लढत होईल. कॅरोलीनने 15व्या मानांकित जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेसचा 6-0, 7-5 असा पराभव केला. गेल्या आठवड्यात इंडियन वेल्समधील स्पर्धा जिंकून प्रकाशझोतात आलेल्या कॅनडाच्या बियांका आंद्रीस्क्‍यू हिने आगेकूच कायम राखली. तिने चौथ्या क्रमांकावरील अँजेलिक केर्बरला 6-4, 4-6, 6-1 असे हरविले. गेल्या आठवड्यात तिने जर्मनीच्या अँजेलिकला अंतिम फेरीत शह दिला होता. बियांकाचा हा सलग दहावा विजय आहे. 

​ ​

संबंधित बातम्या