पुढील वर्षी निवृत्तीचे रोनाल्डोकडून संकेत

शैलेश नागवेकर
Thursday, 22 August 2019

जागतिक फुटबॉलमधील विद्यमान सुपरस्टार पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुढील वर्षी गुडबाय करण्याचे संकेत दिले, पण वयाच्या चाळीशी पर्यंत खेळत रहाण्याचेही सुतोवाच केले. 34 वर्षीय रोनाल्डो व्यायसायिक लीगमध्ये सध्या युव्हेंटसमधून खेळत आहे.

टुरिन - जागतिक फुटबॉलमधील विद्यमान सुपरस्टार पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुढील वर्षी गुडबाय करण्याचे संकेत दिले, पण वयाच्या चाळीशी पर्यंत खेळत रहाण्याचेही सुतोवाच केले. 34 वर्षीय रोनाल्डो व्यायसायिक लीगमध्ये सध्या युव्हेंटसमधून खेळत आहे. 

एका टिव्ही पत्रकाराने रोनाल्डोला निवृत्तीबाबत विचारले असता तो म्हणाला, मी त्याचा विचार करत नाही, परंतु कदाचीत पुढील वर्षी मी पूर्णविराम देऊ शकेन मात्र वयाच्या 40-41 वर्षापर्यंत क्षमता बाळगून असेल. मी नक्की काय करेन हे माहित नाही, सध्या तरी मी फुटबॉलचा आनंद घेत आहे. फुटबॉल कौशल्य ही मला मिळालेली दैवी भेट आहे आणि आनंद मिळेपर्यंत खेळायचे आहे. 

सर्वकालीन श्रेष्ठ फुटबॉलपटूंमध्ये समावेश करण्यात येत असलेल्या रोनाल्डोने प्रतिष्ठेचा "बॉलन डी' हा पुरस्कार पाच वेळा मिळवलेला आहे. गोलांचे अनेक विक्रमही त्याच्या नावावर आहेत. त्याच्या नावावर सर्वात जास्त विक्रम असतील अशी आकडेवारी सांगते. 

माझ्यापेक्षा कोणी अधिक विक्रम केले आहेत का?, मला वाटत नाही, माझ्याच नावावर सर्वधिक विक्रम असतील, असे रोनाल्डोने या मुलाखतीत सांगितले. रोनाल्डोने अनेक विक्रम केले असले तरी तो अजून पोर्तुलागला विश्‍व अंजिंक्‍यपद मिळवून देऊ शकलेला नाही. 

रेयाल माद्रिद आणि रोनाल्डो असे समिकरण झाले होते, परंतु गतमोसमपासून त्याने रेयाल माद्रिदचे साथ सोडली आणि तो युव्हेंटसमध्ये गेला. 28 सामन्यात त्याने 43 गोल केले. त्यामुळे युव्हेंटसला "सिरीज ए' मध्ये विजेतेपद मिळवता आले. 

युव्हेंटस बरोबरचा रोनाल्डोचा करार 2022 पर्यंत आहे त्याअगोदर तो निवृत्त होणार नाही, असे फुटबॉल विश्‍वाचे मत आहे.


​ ​

संबंधित बातम्या