जागतिक मैदानी स्पर्धा : हिमाची दुखापत चिघळली, स्पर्धेतून बाहेर 

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

चारशे मीटर शर्यतीतील ज्युनिअर विश्‍वविजेती आणि सध्या भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेली हिमा दास येत्या 27 सप्टेंबरपासून दोहा (कतार) येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. तिच्या पाठीचे दुखणे चिघळले असल्याने ती भाग घेऊ शकणार नाही. 

नागपूर : चारशे मीटर शर्यतीतील ज्युनिअर विश्‍वविजेती आणि सध्या भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेली हिमा दास येत्या 27 सप्टेंबरपासून दोहा (कतार) येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. तिच्या पाठीचे दुखणे चिघळले असल्याने ती भाग घेऊ शकणार नाही. 

गेल्या काही महिन्यात युरोपात सराव करीत असताना विविध स्पर्धेत दोनशे व चारशे मीटर शर्यतीत सहा सुवर्णपदके जिंकणाऱ्या "ढिंग एक्‍सप्रेस'ला जागतिक स्पर्धेसाठी चारशे मीटर शर्यतीची पात्रता गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळे तिचा फक्त रिले शर्यतीसाठी समावेश करण्यात आला. मात्र, आता दुखापतीने उचल घेतल्याने तिचे सिनिअर गटात प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न भंग झाले आहे. एप्रिल महिन्यात दोहा येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेतही दुखापतीमुळे तिने चारशे मीटर शर्यतीतून माघार घेतली होती. हिमा भाग घेणार नाही, हे स्पष्ट झाल्याने भारताच्या रिले संघाला धक्का बसला आहे. कारण ती महिलांच्या 4-400 व मिश्र रिलेत सहभागी होणार होती.

स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने रिलेसाठी सात महिलांची नावे जाहीर केली. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती. दुखापतीमुळे हिमा भाग घेणार नाही, हे वृत्त बाहेर आले असले तरी अद्याप भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने याविषयी प्रतिक्रीया दिलेली नाही.


​ ​

संबंधित बातम्या