हिमाने अपयशाबद्दल ठरविले दोघांना दोषी

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

आशियाई स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत अंतिम फेरीसाठी अपात्र ठरलेल्या हिमा दासने आपल्या अपयशाबद्दल आसामधील दोन व्यक्तींना दोषी ठरविले आहे. त्या दोघांमुळे मी खूप दबावात होते असे तिने म्हटले आहे.

जाकार्ता : आशियाई स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत अंतिम फेरीसाठी अपात्र ठरलेल्या हिमा दासने आपल्या अपयशाबद्दल आसामधील दोन व्यक्तींना दोषी ठरविले आहे. त्या दोघांमुळे मी खूप दबावात होते असे तिने म्हटले आहे.

हिमाने आशियाई स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरवात 400 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून केली होती. त्यामुळे तिच्याकडून 200 मीटर शर्यतीतही पदक जिंकण्याची आशा होती. आता ती अंतिम फेरीसाठी अपात्र झाल्याने तिने आपल्या अपयशाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

हिमा म्हणाली, की शर्यत सुरु होताना मी खूप दबावात होते. कोणताही खेळाडू एवढा दबाव सहन करू शकत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे माझ्या खेळावर परिणाम झाला. मी आता त्यांची नावे घेणार नाही. पण, ती दोन्ही व्यक्ती आसामची होती. मी याबद्दल माझ्या प्रशिक्षकांशी बोलले असून, तेच याविषयी बोलतील. यापेक्षा जास्त मला बोलायचे नाही आणि वादात पडायचे नाही. त्यामुळे आता हा मुद्दा येथेच थांबायला हवा. आसाममधून भविष्यातही अनेक खेळाडू येणार आहेत, हे मला या दोघांना सांगायचे आहे.


​ ​

संबंधित बातम्या