गांगुली आणि जय शहा यांच्याबाबत हायकोर्टाने दिला निर्णय

शैलेश नागवेकर
Wednesday, 22 July 2020

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या पदाच्या कालावधीबाबत आता दोन आठवड्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

नवी दिल्लीः बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या पदाच्या कालावधीबाबत आता दोन आठवड्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

लोढा समितीच्या शिफारशीनंतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ निश्‍चित करणारा घटनाबदल करण्यात आला. त्यानुसार सौरव गांगुली आणि जय शहा यांचा भारतीय 
क्रिकेट प्रशासनातील सहा वर्षांचा कालावधी संपत आलेला आहे. सध्या आपत्कालीन स्थिती असल्यामुळे या दोघांना मुदतवाढ मिळावी, यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज या प्रकरणाची सुनवणी होती. 

सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती नागेश्वरा राव यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग आहे. गेल्या ऑक्‍टोबरमध्ये बिनविरोध निवड झाल्यानंतर गांगुली आणि शहा यांनी बीसीसीआयमधील पदभार स्वीकारला होता. बीसीआयमध्ये पदाधिकारी होण्याअगोदर गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेत; तर जय शहा गुजरात क्रिकेट संघटनेत पदाधिकारी होती. या दोघांचाही दोन्हीकडील (राज्य संघटना आणि बीसीसीआय) कार्यकाळ सहा वर्षांचा होत आहे. बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार सहा वर्षे पूर्ण झाल्यावर तीन वर्षांचा कुलिंग कालावधी बंधनकारक आहे. 

गांगुली आणि जय शहा यांना मुदतवाढ मिळण्यासाठी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार बीसीसीआयने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या