शिखर धवनने सांगीतला त्याचा निवृत्तीनंतरचा प्लॅन!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

आयपीएल अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने खेळाडू सोशल मिडीयावरती वेळ घालवताना दिसत आहेत. रविचंद्र अश्विन सोबत इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान गप्पा मारत असतान भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन यांने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या भविष्यातील योजना सांगीतल्या आहेत. 

शिखरची विनोदबुध्दी चांगली असल्यामुळे तो भविष्यात क्रिकेट समालोचक बनू शकतो, त्याने सांगीतले की,” माझी विनोदबुध्दी ही माझी खरी ताकद आहे, त्यामुळे कंमेन्ट्री करणे माझ्यासाठी सोपे असेल, खासकरुन हिंदीमध्ये मी चांगली कमेन्ट्री करेल.” असे शिखरने सांगीतले आहे. त्यापुढे तो म्हणाला की, त्याशीवाय “मी एक प्रेरक वक्ता देखील बनू शकतो, भाषण देत असताना मी बासुरी देखील सोबत घेईल, माझ्या जवळच्या वस्तुंचा वापर करणे मला चांगले जमते.” असे देखील शिखरने सांगीतले.    

"2022 पर्यंत स्थगीत होणार टी-20 विश्वकप?"

जर परिस्थीती चांगली असती थर शिखर धवन हा इंडीयन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिचल्स संघाकडून खेळताना दिसला असता, मात्र कोरोना व्हायरसमुळे 29 मार्च रोजी वानखेडे स्टेडीयम वर आयपीएल स्पर्धा सुरु होणारी होती, पण सध्या ही स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आली आहे. शिखर धवनने दिल्ली संघाकडून खेळत असताना आयपीएल 2019 मध्ये  33.42 च्या सरासरीने 521 धावा केल्या होत्या, भारतासाठी अंतरराष्ट्रीय सामना जानेवारीमध्ये खेळला होता, त्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर राहीला आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या