IPL मधील पहिली हॅटट्रिक अन् सर्वाधिक वेळा हा पराक्रम करणारा गडी आठवतोय का?

सुशांत जाधव
Thursday, 30 July 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या युवराज सिंगने या हंगामात दोनवेळा हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला होता. त्याने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु आणि डेक्कन चार्जर्सच्या गड्यांना आपले शिकार केले होते. याच हंगामात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या तिघांना आपल्या जाळ्यात अडकवत आयपीएलमधील पहिली आणि अखेरची हॅटट्रिक साधली होती. 

2008 पासून स्वदेशी आणि परदेशी खेळाडूंच्या कॉकटेल संघ बांधणीने आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी 13 व्या हंगामातील स्पर्धा ही युएईच्या मैदानात रंगणार आहे. फलंदाजांसाठी पर्वणी असलेल्या झटपट क्रिकेटमध्ये 2008 ते 2019 पर्यंतच्या 12 हंगामात तब्बल 19 गोलंदाजांनी हॅटट्रिकची कमाल करुन दाखवली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात तीन गोलंदाजांनी हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. यात दोन गोलंदाज हे महेंद्रसिंह धोनीच्या  चेन्नई सुपर किंग्जचे होते. लक्ष्मीपती बालाजी हा आयपीएलमध्ये हॅटट्रिकची नोंद करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने  किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात पहिली हॅटट्रिक नोंदवली होती. त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या अमित मिश्राने डेक्कन चार्जर्सविरुद्ध हॅटट्रिक साधण्याचा पराक्रम करुन दाखवला. स्पर्धेतील तिसरी हॅटट्रिकही चेन्नईकडून खेणाऱ्या मखाया एन्टोनीने घेतली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या गड्यांची शिकार केली होती. 

#आठवतेय_का? : IPL मध्ये हिटमॅननं MI विरुद्धच केली होती हॅटट्रिकची कमाल!​

2009 च्या हंगामातील हॅटट्रिकवीर

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या युवराज सिंगने या हंगामात दोनवेळा हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला होता. त्याने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु आणि डेक्कन चार्जर्सच्या गड्यांना आपले शिकार केले होते. याच हंगामात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या तिघांना आपल्या जाळ्यात अडकवत आयपीएलमधील पहिली आणि अखेरची हॅटट्रिक साधली होती. 
 
2010-11 आणि 2012  एकाच गड्याने साधली संधी!

या हंगामात रॉयल्स चॅलेंजर बंगळुरुकडून खेळणाऱ्या प्रवीण कुमारने राजस्थान रॉयल्स विरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. त्याच्याशिवाय अन्य कोणालाही या हंगामात हॅटट्रिकला गवसणी घालता आली नाही. 2011 मध्ये पहिल्या हंगामात हॅटट्रिकचा पराक्रम करणाऱ्या अमित मिश्राने डेक्कन चार्जसकडून खेळताना आयपीएलच्या हंगामात दुसऱ्यांदा हॅटट्रिक नोंदवली. 2012 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी एकाच खेळाडूला असा पराक्रम करता आला. राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडीलाने पुणे वॉरियर्सच्या तिघांना आपले शिकाल केले होते.  

2013-14  दोन-दोन गड्यांनी केली कमाल

2013 मध्ये कोलकाताना नाईट रायडर्सच्या  सुनील नरेन याने किंग्ड इलेव्हनच्या विरुद्ध तर अमित मिश्राने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पुणे वॉरियर्सच्या तीन गड्यांना तंबूत धाडण्याचा पराक्रम करुन दाखवला. अमित मिश्राची ही आयपीएलमधील वैयक्तिक तिसरी हॅटट्रीक ठरली. 
2014 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या प्रवीण तांबेने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सलग तीन बळी मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याच हंगामात राजस्थान रॉयल्सच्या शेन वॉटसनने सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचे कंबरडे मोडताना हॅटट्रिकची नोंद केली होती. 

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही​

2016 च्या हंगामात अक्षर पटेल एकमेव गोलंदाज होता ज्याला हॅटट्रिकला गवसणी घालण्यात यश आले होते. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना गुजरात लायनच्या तीन गड्यांना तंबूत धाडत हा पराक्रम आपल्या नावे नोंदवला होता.  

2017 मध्ये त्रिकूटाची कमाल!
रॉयल चॅलेंजर्सचा सम्युअल बद्रीने मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध तर गुजरात लायन्सच्या अँड्रू टायने रायजिंग पुणे सुपरजाएंट्सच्या विरुद्ध हॅटट्रिकचा कारनामा करुन दाखवला होता. या हंगामात पुण्याकडून खेळणाऱ्या जयदेव उनादकटने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध हॅटट्रिकचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला होता.  

2019 च्या बाराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या सॅम करनने डेक्कन चार्जर्स विरुद्ध च्या सामन्यात तीन बळी घेत त्याने हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. गत हंगामात श्रेयस गोपाळनेही विराट कोहलीच्या संघाविरुद्ध हॅटट्रिक साधली होती. आतापर्यंतच्या 12 हंगामात अमित मिश्राने सर्वाधिक तीन वेळा हॅटट्रिकचा पराक्रम नोंदवला असून 2018 च्या हंगामात एकाही गोलंदाजाला हॅटट्रिक साधता आली नव्हती. 


​ ​

संबंधित बातम्या