Asia Cup 2018 : मी एकटाच भारताच्या सगळ्या विकेट्स घेणार : हसन अली

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

इस्लामाबाद : आशिया करंडक स्पर्धेत भारताचे सर्वच्या सर्व दहा फलंदाज मी एकटाच बाद करू शकतो, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने केली आहे.

पाकिस्तानात झालेल्या एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, ''मला भारताविरुद्ध त्यांचे दहा फलंदाज बाद करुन आनंद साजरा करायचा आहे. मी माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.'' यापूर्वी भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या दहाही फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला होता. याच विक्रमाशी बरोबरी करण्याची हसन अलीची इच्छा आहे. 

तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पाकिस्तानला भारताविरुद्ध जास्त संधी असल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ''दडपणाखाली विराट कोहलीचा खेळ बहरतो. त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कर्णधाराला ते जमेलच असे नाही त्यामुळे आम्हाला भारताविरुद्ध जास्त संधी आहेत. भारताविरुद्ध खेळलेल्या अखेरच्या सामन्यात आम्ही त्यांचा पराभव केल्याने त्यांच्यावर जास्त दडपण असणार हे नक्की.''

भारत आणि पाकिस्तान यांनी चॅम्पियन करंडक 2017 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. या अंतिम सामन्यात पाकिस्ताने भारताचा 180 धावांनी पराभव केला होता. आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान 19 सप्टेंबरला समोरासमोर येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आपला पहिला सामना हाँक काँगविरुद्ध खेळणार आहेत. आशिया कंडाकत भारत लागोपाठ दोन सामने खेळणार असल्याचे समोर येताच भारताचे आजी माजी खेळाडू आणि चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघावर जोरदार टीका केली. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. भारत 18 सप्टेंबरला हाँक काँगविरुद्ध पिहला सामना खेळेल तर लगेच दिसऱ्या दिवशी म्हणजेच 19 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळेल.

​ ​

संबंधित बातम्या