खेलो इंडिया स्पर्धाही  अखेर लांबणीवर 

 संजय घारपुरे 
Saturday, 25 July 2020

खेलो इंडियाची यंदापासून विद्यापीठ क्रीडा स्पर्धाही सुरू झाली होती. तिला एका वर्षानंतर ब्रेक देण्यात आला आहे. 

मुंबई : केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी चौथी खेलो इंडिया 2021 मध्ये हरियाणात होईल, अशी घोषणा करताना या मोसमात खेलो इंडिया होणार नसल्याचे जाहीर केले.तिसरी खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा गुवाहाटीत जानेवारीत झाली होती. आता या मोसमातील क्रीडा स्पर्धा डिसेंबर - जानेवारीत अपेक्षित होती, पण या मोसमात ही स्पर्धा होणार नसल्याचे रिजिजू यांनी जाहीर केले. खेलो इंडियाची यंदापासून विद्यापीठ क्रीडा स्पर्धाही सुरू झाली होती. तिला एका वर्षानंतर ब्रेक देण्यात आला आहे. 

रोनाल्डोपेक्षा जास्त गोल; अन् तो मेस्सी नव्हे

देशांतर्गत क्रीडा स्पर्धा सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्‍टोबरच्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्‍यता आहे; पण शालेय आणि महाविद्यलयीन स्पर्धेबाबत अनिश्‍चितता आहे. या परिस्थितीत खेलो इंडिया होण्याची शक्‍यता धूसर होती. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी चौथी खेलो इंडिया स्पर्धा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेनंतर होईल, असे सांगत या मोसमात खेलो इंडिया होणार नसल्याचे स्पष्ट केले.

 


​ ​

संबंधित बातम्या